शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांचा खिसा रिकामा, मनमानी भाडे वसुली रोखणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 14:14 IST

मध्यवर्ती आणि बसस्थानक परिसरात खासगी वाहतूकदारांचा अक्षरश: बाजार भरल्याची अनुभूती प्रवाशांना येत आहे.

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून किती भाडे आकारण्यात यावे, याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, खासगी वाहतूकदार मनमानी भाडे आकारून प्रवाशांचा खिसा रिकामा करीत आहेत.

मध्यवर्ती आणि बसस्थानक परिसरात खासगी वाहतूकदारांचा अक्षरश: बाजार भरल्याची अनुभूती प्रवाशांना येत आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानकात अर्धनग्न आंदोलन केले. तसेच जागरण- गोंधळ घालून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहित आंदोलनात सहभागी नसलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित कायद्याप्रमाणे वेतन देऊ नये, अशी मागणी केली. सिडको बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी मुंडण करीत जागरण-गोंधळ घातला. शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मंगळवारी खासगी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवाशांकडून अवाचे सवा पैसे आकारण्यात येत होते. प्रवासी नेण्यावरून खासगी वाहतूकदारांमध्ये वादही होत होते; परंतु यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी कोणीही नव्हते.

खासगी वाहतूकदारांना एसटी कर्मचाऱ्यांचा विरोधबसस्थानकात खासगी वाहने आणून प्रवासी वाहतूक करण्यास एसटी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्याबरोबर त्यांच्याकडून एसटीपेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्याविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नियमांचे पालन करण्याचे आवाहनसर्व प्रकारच्या खासगी बस, स्कूलबस, कंपनीच्या बसेस, मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या बसेसची वाट न पाहता तसेच बसस्थानकावर गर्दी न करता वेगवेगळ्या ठिकाणाहून या वाहनांतून प्रवास करावा आणि आपली गैरसोय टाळावी. प्रवासादरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन