बीड : हॉटेलात वेटर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील एकाने मालकाची मिनीबस व मोबाईल चोरून नेला. ही घटना काकडहिरा येथे रविवारी उघडकीस आली.दीपक प्रल्हाद नवले (रा. घोटी बोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. तो काकडहिरा येथे विजय दिनकर बागलाने यांच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. रविवारी त्याने बागलाने यांची मिनीबस (क्र. एमएच-२३ वाय- १०३६) व ५ हजारांचा मोबाईल चोरून नेला. बागलाने यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद आहे. (प्रतिनिधी)
नोकराने लावला हॉटेल मालकाला चुना
By admin | Updated: February 6, 2017 23:04 IST