शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी वेळेवर येतात; पण टेबलवर कमी दिसतात; पाच दिवस काम, तरी नागरिकांची कामे होईना

By विजय सरवदे | Updated: February 6, 2024 19:55 IST

कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्या; तरी चार-चार चकरा मारूनही नागरिकांची काम होईना !

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेतील ‘लेट कमर्स’ कर्मचाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सध्या मुख्यालयातील सर्वच विभागांत हजेरीसाठी ‘ग्रामीण ॲप’ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी- कर्मचारी कार्यालयात वेळेवर येतात; पण अनेकदा ते टेबलावर दिसतच नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या नागरिकांकडे ताटकळत बसण्याशिवाय तरणोपाय नसतो.

अलीकडे, सरकारी कार्यालयांत पाच दिवसांचा आठवडा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता शनिवार व रविवार असे दोन दिवस सुट्या मिळत आहेत. कार्यालयीन कामांचा निपटारा करण्यासाठी अगोदर ५:३० वाजता सुटणारे कार्यालय आता सायंकाळी ६:२० पर्यंत चालते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा कारभार सुरळीत चालतो का, जि.प. समाज कल्याण विभागात याचे निरीक्षण सोमवारी सकाळी ९:५० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत करण्यात आले. तेव्हा अधिकारी- कर्मचारी १० वाजेच्या आत कार्यालयात पोहोच झाले. प्रत्येक जण आपापल्या टेबलवर जाऊन नियमित कामकाज करताना दिसून आले; पण तासाभरातच काही जण मोबाइलवर बोलत बाहेर रेंगाळताना दिसून आले, तर काही जण चहापानासाठी निघून गेले. दरम्यानच्या काळात चार- पाच सामाजिक कार्यकर्ते दलित सुधार योजनेबाबत माहिती घेण्यासाठी आले होते. मात्र, योजनेचा आराखडा अंतिम झाला नसल्यामुळे त्यांच्या हाती निराशाच पडली. अन्य दोघे जण उपकरातील योजनांच्या यादीतील नावांबाबत खातरजमा करण्यासाठी आले होते.

वेळ ९:४५ ची, १०:१० पर्यंत येणे सुरूचपाच दिवसांचा आठवडा सुरू झाल्यापासून कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९:४५ वाजेची आहे. मात्र, अनेक जण धावतपळत १०:१० वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचताना दिसून आले.

चार-चार चकरा मारूनही काम होईनासरकारी काम आणि सहा महिने थांब, याचा प्रत्यय आम्हाला आला. अनु. जाती व नवबौद्ध वस्ती विकासाची कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. नेमके घोडे कुठे आडले, हे पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. मात्र, यासंबंधीचा आराखडाच अजून अंतिम झाला नसल्याचे सांगण्यात आले.- दामूअण्णा कांबळे

कर्मचारी कामावर नाही, असे होत नाही‘ग्रामीण ॲप’मुळे सर्वांनाच आता वेळेत यावे लागते. जो उशिरा येईल, त्याची आपोआप अर्ध्या दिवसाची हजेरी लागते. कोणी टेबलवर दिसत नाही, याचा अर्थ कर्मचारी कामावर नाही, असा होत नाही. वरिष्ठांना कामांची माहिती देण्यासाठी कर्मचारी मोबाइलवर बोलतात. अनेकदा कार्यालयात मोबाइलची रेंज येत नाही, यामुळे त्यांना कार्यालयाबाहेर यावे लागते.- डॉ. ओपप्रकाश रामावत, प्रभारी समाजकल्याण अधिकारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद