शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा; विभागीय आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 13:44 IST

विभागीय आयुक्तालयात चार तास चाललेल्या बैठकीत लॉकडाऊनमधील परिस्थिती, उपाययोजना, रुग्ण आणि मृत्यूदराबाबत आढावा घेण्यात आला.  

ठळक मुद्देरुग्ण उशीराने रुग्णालयात दाखल होत असल्यामुळे उपचारास उशीरमृत्यूदर आणि रुग्णसंख्येबाबत चिंता  जेष्ट नागरिकांची तपासणी करण्यासाठी पालिकेची १ हजार पथके

औरंगाबाद : कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना घरीच क्वारंटाईन करण्याचा पर्याय आहे. परंतु जवळचे कुणी रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढून शहरात आजार पसरण्याची भीती आहे. त्यामुळे सौम्य किंवा लक्षण विरहीत असलेल्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन (संस्थात्मक उपचार) करण्यावर भर देण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी दिले.  

विभागीय आयुक्तालयात चार तास चाललेल्या बैठकीत लॉकडाऊनमधील परिस्थिती, उपाययोजना, रुग्ण आणि मृत्यूदराबाबत आढावा घेण्यात आला.  रुग्ण उशीराने रुग्णालयात दाखल होत असल्यामुळे उपचारास उशीर होत आहे. लागण झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत रुग्ण दवाखान्यात दाखल झाला तर उपचार वेगाने करता येतात. उशीर झाला तर रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते, शिवाय तसेच इतर आजार असतील तर गुंतागुंत वाढते. त्यामुळे रुग्ण दगावत आहेत, असे आयुक्तांना यंत्रणेने सांगितले. 

इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनला प्राधान्य सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नाहीत अशांना घरीच राहुन उपचार करता येण्याबाबत सुचना असल्या तरी त्यास रुग्णांपासूनच इतरांना आजाराची लागण होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे त्या रुग्णांना कुटूंबातील इतर सदस्य, संपर्कात आलेल्या लक्षणे दिसून येत आहेत त्यांना घरी न ठेवता त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करावे लागणार आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी हे करावेच लागेल. गरज असेल तरच होम क्वारंटाइन करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. 

होम क्वारंटाईनबाबत आयुक्त निर्णय घेतीलज्या व्यक्तीच्या घरी रुग्णाची स्वतंत्र व्यवस्था होऊ शकते. त्यांना होम क्वारंटाईन करण्याबाबत डॉक्टर परवानगी देत होते. मात्र आता मनपा आयुक्त होम क्वारंटाईनची परवानी देतील. रुग्णाबाबत खात्री करुनच परवानगी द्यावी. असे आदेश केंद्रेकर यांनी दिले. महापालिका क्षेत्रामध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी पालिकेने १ हजार पथके तयार केल्याची माहिती केंद्रेकर यांना मनपातर्फे देण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय