शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ईएमआय बदलणारी टोळी?

By admin | Updated: March 30, 2016 00:09 IST

नांदेड :कोणत्याही मोबाईलचा आयएमईआय क्रमांक हा खूप महत्वाचा असतो़ यापूर्वी चोरीच्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक बदलण्यासाठी हैदराबाद येथे पाठविण्यात येत होते़

नांदेड :कोणत्याही मोबाईलचा आयएमईआय क्रमांक हा खूप महत्वाचा असतो़ यापूर्वी चोरीच्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक बदलण्यासाठी हैदराबाद येथे पाठविण्यात येत होते़ त्यामुळे पोलिसांनाही ट्रॅकींगमध्ये असे मोबाईल सापडत नव्हते़ त्यात आता नांदेडातही आयएमईआय क्रमांक बदलण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही़ नांदेडात हा प्रकार सुरु असताना गांधी पुतळ्याजवळील एका दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेने छापाही मारला़ साहित्यही जप्त केले़ परंतु त्यानंतर गेले १५ दिवस तपास सुरु असल्याच्या नावाखाली हे प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात आले आहे़ नांदेड शहरात महिन्याकाठी शेकडो मोबाईल चोरीस जातात़ यामध्ये ज्यांच्याकडे मोबाईलचे पक्के बिल आहे अशापैकी काहीच जण मोबाईल हरवल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात करतात़, परंतु एकदा चोरीस गेलेला मोबाईल पुन्हा कधीही सापडत नाही ही गोष्ट खरी़ त्यानंतर हे चोरीचे मोबाईल थेट हैदराबादकडे पाठविण्यात येतात़ नांदेडात अशाप्रकारे चोरीचे मोबाईल विकत घेणारी मोठी टोळी कार्यरत आहे़ हैदराबाद येथे या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक बदलून ते पुन्हा विक्री केले जातात़ विशेष म्हणजे एखाद्या गुन्ह्याच्या तपासात आयएमईआय क्रमांक महत्वाचा मानला जातो़ त्या आधारे न्यायालयात अनेक प्रकरणात शिक्षाही होते़ क्रमांक बदलण्याचा असा प्रकार नुकतेच नांदेडातही उघडकीस आला आहे़ नांदेडातील एका ग्राहकाने आपला मोबाईल दुरुस्तीसाठी गांधी पुतळ्याजवळील एका दुकानात दिला होता़ परंतु या ठिकाणी त्या मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकात खाडाखोड केल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी ही बाब लगेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांना सांगितली़ त्यानंतर १४ मार्च रोजी स्थागुशाने या दुकानावर छापा मारुन १४० मोबाईल आणि ३ मदरबोर्ड जप्त केले होते़ हे सर्व साहित्य स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात जमा करण्यात आले़ परंतु या प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही़ त्याचबरोबर जप्त केलेले साहित्य तपासणीसाठी तांत्रिक विभागाकडे देण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे म्हणणे आहे़ परंतु आयएमईआय क्रमांक बदलण्याच्या गंभीर प्रकाराबाबत मंदगतीने सुरु असलेल्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ मोबाईलच्या ईएमआय बदल प्रकरणात पोलिसांच्या तपासाची दिशा योग्य राहिल्यास मोबाईल चोरी करणारी आणि आयएमईआय क्रमांक बदलणारी मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागू शकते हे मात्र नक्की़ (प्रतिनिधी)