शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
14
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
15
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
16
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
17
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
18
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
19
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
20
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा

शिक्षण प्रवाहातून उभारी

By admin | Updated: July 17, 2014 00:21 IST

गंगाधर तोगरे, कंधार शिक्षण प्रवाहात सर्वांना सामावून घेण्यासाठी शासनाने कोणतीही कसर ठेवली नाही.

गंगाधर तोगरे, कंधारशिक्षण प्रवाहात सर्वांना सामावून घेण्यासाठी शासनाने कोणतीही कसर ठेवली नाही. विशेष गरजा असणाऱ्या ५८६ मुलांना शिक्षण प्रवाहातून उभारी देण्यासाठी सर्वशिक्षा अभियानातील अपंग समावेशीत शिक्षण उपक्रमाचा मोठा आधार मिळत असल्याचे दिसते. अपंगत्वावर मात देवून उन्नतीचा मार्ग धरतानाचे चित्र आशादायक असून प्रेरणादायी आहे.स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ग्रामीण भागातील दारिद्र्य अवस्थेत व कनिष्ठ जातीत जगणाऱ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे, असा महात्मा फुले यांनी आग्रह धरला. म. फुले यांनी परिवर्तन नितीच्या सापेक्षतेने शिक्षण विषयक सिद्धांत मांडला. केवळ सिद्धांत न मांडता समाज परिवर्तनासाठी त्यांनी कृतीशीलतेवर भर दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघीणीच्या दुधाची उपमा दिली. शिक्षणाची महती महापुरुषांनी, समाजसुधारकांनी अनेकदा अधोरेखीत केली. समाजात प्रचलित असलेल्या अघोरी रुढी, परंबपरा, असमानता, अन्याय, अत्याचाराविरोधात लढण्याचे बळ शिक्षणातून मिळते. अशी क्रांतीकारक विचारधारा फुले, शाहू, आंबेडकर आदीच्या मौलिक विचारातून दिसते. त्यासाठी समता, बंधुत्व, न्याय मिळवून देणारी शिक्षण पद्धती असावी. यावर महापुरुषांचा अधिक भर राहिला.स्वातंत्र्यानंतर शासनस्तरावरुन धर्म, जात, पंथ, वंश, रंग आदीत भेदगाव न करता सर्वासाठी शिक्षणाची दारे उघडण्यात आली. कमकुवत, वंचित, उपेक्षीत पतहीन, अज्ञानी, रंजले, गांजलेल्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी विविध सोयी-सुविधा दिल्या जाऊ लागल्या. मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, मुलींना उपस्थिती भत्ता आदी योजनेतून देण्याची सोय शासनाने केली. त्याच पद्धतीने सर्व शिक्षण हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे शिक्षण हे सर्वसामान्य शिक्षणातील अविभाज्य घटक मानला गेला आणि गरजेनुसार सर्वसामान्य शिक्षण योजनेत सहभागी करुन घेण्यात आले.सर्वसमावेशित शिक्षण उपक्रम गटशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एस. मलगिरवार, पी. जी. काळे या विशेष तज्ज्ञांच्या सहकार्यातून पी. डी. ढवळे, एस. एस. गायकवाड, डी. एस. चाटे, एस. बी. सूर्यवंशी, पी. एम. सोनकांबळे, जे. एम. स्वामी, तपासे या अंध व मतिमंद, अपंग शाळा वगळून जि. प. व शासनमान्य खाजगी शाळेत विशेष शिक्षकामार्फत अपंग मुलांना अध्यापन केले जाते. अध्यापनात ब्रेललिपी, स्पीच थेरपी आदींचा तसेच शैक्षणि साहित्य, उजळणी याचा वापर केला जातो.अपंग प्रकारानुसार सर्व बाबी शिकविल्या जातात. तीनचाकी सायकल १, व्हील चेअर मोठ्या ४, व्हील चेअर लहान ९, कुबडी जोड २, अंधकाठी १, अंधपाटी १, रोलेटर लहान १०, रोलेटर मोठे १, कॅलीपर ११ अशा चाळीस साहित्यांचे मोफत वाटप २७ जणांना मागील वर्षी करण्यात आले. शाळेत ७५ टक्के उपस्थित असणाऱ्यांना सोबत मदतनिसास प्रवास व मदतनीस भत्ता ३३ जणांना देण्यात आला.अपंग मुुलांचा आत्मविश्वास वाढविणे, न्यूनगंडाची भावना कमी करणे, भाषा वाढीस चालना देणे व वर्तन समस्या कमी करणे, जिद्द व चिकाटी वाढविणे, सामाजिकीकरण करणे व कमी वयातील अपंगत्व कमी करण्यासाठी उपचार करुन बरा करणे यासाठी प्रयत्न केले जातात. माता-पालकांना जागे करुन मुला-मुलींना शाळेत प्रवेशासाठी प्रयत्न केले जातात. समावेशित शिक्षणातून अपंगत्वावर मात करुन नवी उभारी देण्याचा प्रयत्न सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत केले जात आहेत़ बहुविकलांग मुलांचा समावेश ५८६ अपंग असणाऱ्या विद्यार्थी संख्येत ३४९ मुले व २३७ मुलींचा समावेश आहे. अपंग प्रकार असा-अल्पदृष्टी मुले ४१, मुली ३७, दृष्टीदोष मुले १४, मुली १४, कर्णबधीर मुले ११, मुली १४, वाचादोष मुले ३७, मुली १७, अस्थिव्यंग मुले ११६, मुली ५७, मतिमंद मुले ९६, मुली ५९, बहुविकलांग मुले ८, मुली ९, मेंदूचा पक्षघात मुली २,अध्ययन अक्षम मुले २७, मुली २७, स्वमग्न मुले ३ व १ मुलीचा समावेश आहे़