रमेश माळी
वेरूळ : जगप्रसिद्ध असलेल्या वेरूळ लेणीच्या आवारात आठ एकरांत उभारलेले पर्यटक अभ्यागत केंद्र गेल्या चार वर्षांपासून अडगळीत पडले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून हे केंद्र उभारले गेले; पण तो निधी पाण्यात गेला आहे. या केंद्राला गाजरगवताने वेढा घातल्याने विदारक चित्र पाहावयास मिळाले आहे, तरी देखील एमटीडीसी विभाग डोळेझाक करून झोपेचे सोंग घेत आहे.
भविष्यकाळात वेरूळ लेणीला कोणताही धोका निर्माण होऊ नये. पर्यटकांना अभ्यागत केंद्रातूनच वेरूळ लेणीचे दर्शन घडावे, याकरिता पर्यटन विभागाने २००६ साली वेरूळ अभ्यागत केंद्राची निर्मिती करण्यास सुरुवात केली. ९० कोटी रुपयांच्या निधीतून सुमारे साडेसहा वर्षांत हे पर्यटन अभ्यागत केंद्र उभारले गेले. २०१३ साली हे केंद्र पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर २०१७ पर्यंत हे केंद्र पर्यटकांसाठी खुले होते.
दरम्यान, विविध सुविधांचा अभाव व मिळणारे उत्पन्नामुळे देखभाल दुरुस्तीला निधी कमी पडू लागला. अखेर त्यामुळे एमटीडीसी विभागाकडून हे पर्यटन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात महावितरणची वीज थकबाकी ही कोट्यवधी रुपयांत गेल्याने त्यांनी कारवाई करून वीज कापली. २०१७ ते आजतागायत हे केंद्र बंदच आहे. लोकप्रतिनिधी व एमटीडीसी विभागाकडून पुढाकार घेऊन हे पर्यटन अभ्यागत केंद्र सुरू केले, तर यातून प्रशासनाला नक्कीच उत्पन्नाचा मार्ग मिळेल, तर दुसरीकडे पर्यटनाला देखील चालना मिळेल.
------
सुविधा देण्यात प्रशासन अपयशी
एमटीडीसीकडून उभारण्यात आलेले वेरूळ पर्यटन केंद्र हे फक्त शोभेची वस्तू बनली आहे. तिथे पार्किंग सुविधा नसल्याने पर्यटन केंद्राचा उपयोग होत नाही. वेरूळ येथील पर्यटन अभ्यागत केंद्र हे उभारल्यापासूनच प्रशासनाचा पांढरा हत्तीच बनले आहे. अनेक ऐतिहासिक वस्तू, साहित्याचा ठेवा आहे; परंतु ते कायम बंद असल्याने अडगळीत पडले आहे. जनावरांचा वावर वाढल्याने हे केंद्र आता जनावरांचे निवासस्थान बनले आहे.
----
फोटो : पर्यटन अभ्यागत केंद्रात दयनीय अवस्था झालेली इमारत. मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आजूबाजूला पूर्णपणे वाढलेले गवत. यावरून एमटीडीसीचे किती दुर्लक्ष आहे, हे लक्षात येते.
260921\1721-img-20210926-wa0066.jpg
आज पर्यटन दिवस
वेरुळ चे पर्यटन अभ्यागत केंद्र"झाले पडीत
"कोट्यवधी रुपये खर्चूनही अजुनही बंदच"
"वेरुळचे पर्यटन केंद्र बनले शोभेचे वस्तू"संपूर्ण पर्यटन केंद्र गाजर गवतात.
उर्वरित फोटो लोकमत रुरल वर पाठवले आहे