शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या स्वागतावर नाइट कर्फ्यूचे विरजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:08 IST

corona virus curfew in Aurangabad झालर क्षेत्र आणि ग्रामीण हद्दीतील ढाबे, हॉटेल्स या संचारबंदीच्या काळात बंद असतील. 

ठळक मुद्दे रात्री १०.३० वाजेनंतर हॉटेल सुरू राहिल्यास कारवाई  ग्रामीण भागातदेखील ५ जानेवारीपर्यंत संचारबंदी असेल

औरंगाबाद : ब्रिटनमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून, त्या पार्श्वभूमीवर  राज्यभर रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) जारी करण्यात आला आहे. महापालिका हद्दीत मंगळवारपासून रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ग्रामीण भागातदेखील ५ जानेवारीपर्यंत संचारबंदी असेल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे नाताळ व नववर्षाच्या स्वागतावर नाइट कर्फ्यूमुळे विरजन पडले आहे. 

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, ‘रात्री १०.३० वाजेनंतर जे हॉटेल, आस्थापना, दुकाने सुरू राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या संचारबंदीत प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीत संचारबंदी असणारच आहे. शिवाय ग्रामीण पोलीस हद्दीत असलेले ढाबे, हॉटेल्स यावरदेखील प्रशासनाची नजर असणार आहे.’  विमानतळावर तपासणी कडक करण्यात येणार आहे, तसेच झालर क्षेत्र आणि ग्रामीण हद्दीतील ढाबे, हॉटेल्स या संचारबंदीच्या काळात बंद असतील. 

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले, ‘रात्रीची संचारबंदी पाळण्याची जबाबदारी सर्वांची आहे. १५ दिवसांसाठी ही संचारबंदी आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत  महत्त्वाचे काम नसेल, तर कुणीही घराबाहेर पडू नये. कायद्याचे उल्लंघन केल्यास  कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर येऊ नये.  मात्र, जे ऐकणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई होईल.’

काय सुरू राहणारआरोग्यसेवा, मेडिकल दुकाने, रात्रपाळीतील उद्योग सुरू राहणार आहेत. रात्रपाळीवरून घराकडे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे संस्थेचे ओळखपत्र आवश्यक आहे. मालवाहतूक, उद्योग, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहील. 

बंद काय राहणाररात्री १०.३० वाजेनंतर हॉटेल्स बंद राहतील. बाजारपेठा बंद राहतील. पाचपेक्षा जास्त लोक जमतील, असे कोणतेही ठिकाण सुरू राहणार नाही. सकाळी ६ वाजेनंतर रात्री ११ वाजेपर्यंत दैनंदिनी सुरू राहील.

लग्नसमारंभांवर करडी नजर५० पेक्षा जास्त नागरिकांना लग्नसमारंभात निमंत्रित करू नये, अशी नियमावली            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असताना याचे उल्लंघन होत आहे, अंत्ययात्रेसाठीदेखील गर्दी        होत आहे. नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी लग्नसमारंभांवर करडी नजर  ठेवण्यासाठी विशेष पथक कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

अचानक छापा मारणाररात्रीच्या संचारबंदीचे कुणीही उल्लंघन करू नये. पोलीस यंत्रणेने काही स्पॉट निश्चित केलेले आहेत. त्याठिकाणी अचानक छापा मारून तपासणी करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिला.

संचारबंदीत यांना सूट; पण ओळखपत्र आवश्यकआरोग्य सेवा, औषधी दुकाने, औद्योगिक कारखाने, औद्योगिक कारखान्यातील कामगार, मालवाहतूक करणारी वाहने, मजूर, हमाल, अत्यावश्यक सेवा, पेट्रोल पंप, कॉल सेंटर, आवश्यक आस्थापनांवर रात्रीचे काम करणारे कर्मचारी, अधिकारी, दळणवळण, दूरसंचार, पाणीपुरवठा यंत्रणा, बस, खासगी बस आदींना संचारबंदीतून सूट असेल. तसेच संचारबंदी कालावधीत रात्री बाहेर पडणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, कारखान्यातील कर्मचारी, अधिकारी, आवश्यक आस्थापनांवरील अधिकारी, कर्मचारी, मजूर आदींना संचारबंदी काळात सूट देण्यात येते आहे. मात्र, संबंधितांनी ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. ते नसेल तर वाहन परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी ओळखपत्र म्हणून सोबत बाळगण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या