शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

अकरा हजार विद्यार्थी देणार आज ‘नेट’

By admin | Updated: December 28, 2014 01:28 IST

औरंगाबाद : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उद्या रविवारी ‘नेट’चे आयोजन करण्यात आले असून, या परीक्षेला मराठवाड्यातील ११ हजार ६५ विद्यार्थी बसले आहेत.

औरंगाबाद : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उद्या रविवारी ‘नेट’चे आयोजन करण्यात आले असून, या परीक्षेला मराठवाड्यातील ११ हजार ६५ विद्यार्थी बसले आहेत. मागील परीक्षेच्या तुलनेत यावेळी ‘नेट’साठी विद्यार्थ्यांची संख्या ६ हजारांनी जास्त आहे. परीक्षेसाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) सहयोगाने पहिल्यांदाच ही परीक्षा घेतली जाणार असून, शहरातील देवगिरी महाविद्यालय, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, मौलाना आझाद महाविद्यालय, डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालय (नवखंडा), स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय या केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे आठ निरीक्षक तैनात करण्यात आले असून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचेही काही अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.