परंडा : बीड येथील भरारी पथक व महावितरण उपविभाग परंडा यांनी संयुक्त कारवाई करीत शहरातील चौघा वीजचोरांना पकडले. ही कारवाई ७ मे रोजी करण्यात आली. संबंधितांना अंदाजे दोन लाख वीस हजारांचा दंड करण्यात आला आहे.दोन वर्षांपासून परंडा शहर हे भारनियमनमुक्त झाले आहे. त्यामुळे व्यवसायिकांसोबतच शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे. असे असतानाच शहरामध्ये वीजचोरी असल्याची माहिती महावितरणच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार बीड येथील भरारी पथक व उपविभाग परंडा यांनी संयुक्तरित्या गुरूवारी कारवाई केली. या कारवाईमध्ये वीज चोरी करताना चार ग्राहक आढळून आले. यामध्ये राजाराम पंढरी शिंदे, दत्ता सोनाजी मेहर, जावेद रज्जाक शेख, आमन उखखान पठाण (वीज वापरणारा) व त्याचा मालक (ग्राहक) शेरखॉ खलिफाखॉ पठाण यांच्याविरूद्ध भादंविचे कलम १३५ प्रमाणे कारवाई करून त्यांना अंदाजे २ लाख २० हजार रूपये इतका दंड आकारण्यात आला आहे. निर्धारित वेळेत दंडाची रक्कम न भरल्यास त्यांच्याविरूद्ध कलम १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या धडक कारवाईमुळे वीज चोरी करणाऱ्यांच्या धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)
वीजचोरी पकडलीं
By admin | Updated: May 8, 2015 00:26 IST