शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

विद्युत पोलअभावी वीजपुरवठा ठप्प

By admin | Updated: June 17, 2014 01:12 IST

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अनेक गावांना मृग नक्षत्रापूर्वी ६ जून रोजी झालेल्या वादळी पावसाचा तडाखा बसला.

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अनेक गावांना मृग नक्षत्रापूर्वी ६ जून रोजी झालेल्या वादळी पावसाचा तडाखा बसला. यात शिवारातील अनेक विद्युत पोल उखडून पडले. परंतु, अद्यापि तेथे नवीन पोल बसविण्यात आले नसल्याने विद्युत पोलअभावी वीजपुरवठा ठप्प झाला असून, विद्युत पोल मिळविण्यासाठी बळीराजाचे महावितरण गट कार्यालयास खेटे घालणे सुरूच आहे. विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे कृषी पंपसुद्धा बंद आहेत. मार्च महिन्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सर्वच गावास सलग १८ दिवस गारपिटीने झोडपले होते. तेव्हासुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पोल मोडून पडले होते. त्याची दुरुस्ती होते न होते तोच जून महिन्यात पुन्हा वादळी पाऊस झाला आणि त्याचा हालकी, उजेड, सय्यद अंकुलगा, बाकली, तळेगाव (बो.), डोंगरगाव आदी गावांना फटका बसला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पोल झुकले. काही ठिकाणी मोडून पडले. विजेच्या तारा लोंबकळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीचा विद्युत पुरवठा ठप्प झाला. परिणामी, विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी शेतकरी महावितरणच्या गट कार्यालयास खेटे घालीत आहेत. तरीही महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन विजेची दुरुस्ती तात्काळ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. (वार्ताहर)साहित्य मिळेना...अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रान्सफार्मरला फ्यूज नाहीत. चिमण्या नाहीत. केबल मिळत नाहीत. झुकलेल्या तारा अडचण करीत आहेत. या तडजोडीच्या साहित्यावाचूनही अनेक शेतकऱ्यांची अडचण होत आहे. शिवाय, या छोट्या-छोट्या वस्तूमुळे कृषीपंप बंद पडत आहेत. सहाय्यक अभियंता युसुफोद्दीन शेख म्हणाले, मागणीप्रमाणे लाईनमनच्या शिफारशीवरून विद्युत पोल, विद्युत साहित्य देण्यात येत आहे.