शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 16:05 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत ८ पैकी ६ जागा जिंकत आ. सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलने वर्चस्व राखले.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत ८ पैकी ६ जागा जिंकत आ. सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलने वर्चस्व राखले.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या आठ जागांसाठी आज निवडणूक झाली. यातील आरक्षित चार जागा बिनविरोध निघाल्या होत्या. उर्वरित खुल्या गटातील चार जागांमधील दोन जागा बिनविरोध निघण्याची शक्यता होती. मात्र उत्कर्ष पॅनलमध्ये बंडखोरी झाल्यामुळे एकही जागा बिनविरोध निघाली नाही. यामुळे आज खुल्या गटातील जागेवर कोण निवडून येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.

पदवीधर गटात डॉ. नरेंद्र काळे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज डॉ. संभाजी भोसले यांनी उमेदवारी कायम ठेवली होती. यात डॉ. काळे यांनी विजय मिळवला. संस्थाचालक गटात माजी मंत्री राजेश टोपे यांच्या पत्नीला बिनविरोध निवडून आणण्यासाठी पडद्याआड जोरदार हालचाली झाल्या. मात्र अपक्ष भाऊसाहेब राजळे आणि संजय निंबाळकर यांनी टोपे यांच्या हालचालींना खो घालत अर्ज कायम ठेवले. त्यामुळे मनीषा टोपे यांनी माघार घेतली. याच वेळी उत्कर्षतर्फे जालन्याचे कपिल आकात यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे तिहेरी लढत झाली, यात विद्यापीठ विकास मंचाच्या संजय निंबाळकर यांनी बाजी मारली.

तर प्राचार्य गटात प्राचार्य गटात डॉ. हरिदास विधाते (बिनविरोध ओबीसी गट), प्राध्यापक गटात उत्कर्षचे डॉ. राजेश करपे हे विजयी झाले.

संपूर्ण निकाल खालील प्रमाणे :

- उत्कर्षचे विजयी उमेदवार1.प्राचार्य डॉ .जयसिंग देशमुख(प्राचार्य गट)2.डाॅ.राजेश करपे (अध्यापक गट)3.डाॅ.नरेंद्र काळे(पदवीधर गट)4.राहूल म्हस्के(बिनविरोध-राखीव- व्यवस्थापन )5.सुनील निकम(बिनविरोध-राखीव पदवीधर )6.डाॅ.फुलचंद सलामपुरे (बिनविरोध-राखीव प्राध्यापक गट)

- विद्यापीठ विकास मंचतर्फे1) प्राचार्य गटात डॉ. हरिदास विधाते (बिनविरोध ओबीसी गट)2) संजय निंबाळकर (संस्थाचालक गट)

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादElectionनिवडणूकEducation Sectorशिक्षण क्षेत्रSatish Chavanसतीश चव्हाण