शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका कायद्याच्या कचाट्यात, इच्छुकांचा ‘नॅनो गुढ्या’ वाटपातून संपर्क वाढविण्यावर भर

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 18, 2023 12:25 IST

बाजारात विक्रीला आलेल्या ‘नॅनो गुढी’ राजकारण्यासाठी प्रचाराच्या आधार बनल्या आहेत.

- प्रशांत तेलवाडकरछत्रपती संभाजीनगर : सध्या मनपाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत; पण नगरसेवकपदी आरूढ होण्यासाठी इच्छुकांनी आता गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत अधिकाधिक संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने ‘नॅनो गुढ्यां’चे वाटप वॉर्डात करण्याचे ठरवले आहे. यामुळे नॅनो गुढ्यांचे बुकिंग वाढले असून निवडणुका जरी कायद्याच्या कचाट्यात अडकल्या असल्या तरी ‘नॅनो गुढ्या’ची चर्चा जोमात आहे.

गुढी पाडवा सण बुधवारी, २२ मार्चला साजरा करण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून शोभेच्या रेडिमेड नॅनो गुढ्या बाजारात विक्रीला येत आहे. यंदाही या सुंदर गुढ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. घरासमोर सर्वांना दिसेल अशा उंच ठिकाणी गुढी उभारली जाते. तसेच वर्षभर शोकेसमध्ये ठेवण्यासाठी शोभेच्या गुढ्याही हौशीने घेतल्या जातात. राजकारणी हे काळाची पावले ओळखणारे असतात. सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. महानगरपालिका निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. अनेकांनी निवडणूक लवकर व्हावी, यासाठी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. काहींनी तर आतापासून विविध मार्गाने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यात महत्त्वाचा सण ‘गुढी पाडवा’ हा सण कॅच करण्यासाठी काही जवळचे कार्यकर्ते, काही मतदारांना नॅनो गुढी भेट देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार विक्रेत्यांकडे ऑर्डर देणेही सुरू झाले. खास मर्जीतील कार्यकर्ते, अधिकारी यांना काचेतील नॅनो गुढी देण्यासाठी सरसावले आहेत. यामुळेे इच्छुकांमुळे गुढ्यांचा बाजार जोमात आहे. अशी माहिती नॅनो गुढी डिझायनर नीलेश मालानी यांनी दिली.

रेडिमेड गुढ्यांना चढला भावतांबे महागल्यामुळे नॅनो गुढीवर ठेवण्यात येणारा तांब्याचा गडू २० रुपयांनी महागला, तर रेडिमेड नॅनो गुढीचे भाव दीडपटीने वाढले आहे. ६ इंचांच्या गुढीला ७५ रुपयांना, ९ इंचांची गुडी १०० रुपयांना, तर १२ इंची गुढी १२० रुपयांना प्रति नग विकत आहेत. तर काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेली ८ इंचांची गुढी १७५ रुपयांना मिळत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgudhi padwaगुढीपाडवा