शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

कमोडचा रंग असा का? तुमची श्रेणी कोणती? निवडणूक निरीक्षकाच्या जाचाला अधिकारी वैतागले

By विकास राऊत | Updated: May 2, 2024 13:52 IST

या निरीक्षकाबाबत जालना जिल्हा प्रशासनाने एक गोपनीय अहवाल निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांना पाठविला असल्याचे समजते.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन निवडणूक आयोग करीत असताना आयोगाने नेमलेले निवडणूक निरीक्षक मात्र सहलीवर आल्यासारखे वागू लागले आहेत.

जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक राजेशकुमार यांनी विश्रामृहातील कमोडच्या रंगावरून बांधकाम विभागाच्या अभियंत्याची खरडपट्टी केली. सुभेदारी विश्रामगृहातील बाथरूममध्ये ग्रे रंगाऐवजी पांढऱ्या रंगाचे कमोड का? बेसीन वेगळ्या रंगाचे का? फ्लशला प्रेशरने पाणी येत नाही, एअर फ्रेशनर का नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती करून लायझनिंगला असलेल्या अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. निरीक्षकांच्या अशा जाचाला अधिकारी वैतागले आहेत. निरीक्षक राजेशकुमार यांची व्यवस्था प्रारंभी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलात करण्यात आली होती. तिथेही त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातल्याचे समजते. याबाबत हॉटेल व्यवस्थापनाने तक्रार दाखल केलेली नाही. या निरीक्षकाबाबत जालना जिल्हा प्रशासनाने एक गोपनीय अहवाल निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांना पाठविला असल्याचे समजते.

राजेशकुमार हे यंत्रणा कुचकामी असल्याचे बोलून अधिकाऱ्यांचा अवमान करीत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दिमतीला असलेल्या अधिकाऱ्यांची श्रेणी कोणती आहे, यावरून विचारणा करीत आहेत. रात्री-अपरात्री फोन करून त्रास देत आहेत. त्यांच्या गैरहजेरीत एखादी प्रक्रिया पूर्ण केली तर त्यावरून झापत असतात. या सगळ्या बाबींमुळे एकेक काम दोनवेळा करण्याची वेळ यंत्रणेवर येत आहे. निवडणूक कामाला गैरहजर राहिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित का केले नाही. यावरूनही निरीक्षकांनी यंत्रणेला धारेवर धरले. फॉर्म बारा ड चे दोन वेळा करण्यास भाग पाडले. राजकीय पक्ष प्रतिनिधी बैठकीला आल्यानंतर त्यांचीही निरीक्षकांनी उलट चौकशी केली. या तक्रारींविषयी निवडणूक निरीक्षक राजेशकुमार यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी फोन घेतला नाही.

उत्तराखंडमध्येही दिली होती तक्रार...२०२३ मध्ये राजेशकुमार हे उत्तराखंडमध्ये बागेश्वर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक असताना भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

व्हिसीमध्येही तक्रारींचा पाढा.....आयोगाच्या व्हिसीमध्ये निवडणूक निरीक्षकांनी जालना मतदारसंघातील जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार केली. फुलंब्री, सिल्लोड, पैठण हे विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडेही सहायक निवडणूक अधिकारी निरीक्षकांबाबत तक्रारी करीत आहेत. याबाबत उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांना विचारले असता, त्यांनी हा विषय सचिव बनसोडे यांच्या अखत्यारित असल्याचे सांगून हात झटकले.

समन्वय ठेवण्याचा प्रयत्न...काही बाबी गोपनीय असतात, त्या सांगता येत नाहीत. निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. प्रशासन निरीक्षकांशी पूर्णत: समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.- श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी जालना

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४