देवणी : येथील पंचायत समितीतील कनिष्ठ लेखाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या खात्यात भरावयाची रक्कम आर.टी.जी.एस. व्दारे स्वत:च्या खात्यावर वळवून जवळपास आठ लाख रुपयांचा अपहार केला़ या प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरुन देवणी ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी ६़३० वा़ गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ देवणी पंचायत समितीतील कनिष्ठ लेखाधिकारी अजित बाबुराव रासुरे याने कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी आणि आऱ डी़ च्या खात्यात जमा करावयाची ७ लाख ९८ हजार ५६० रुपयांची रक्कम स्वत:च्याच लातूर येथील खात्यात जमा करुन अपहार केला़ आऱ टी़ जी़ एस़ प्रणालीव्दारे संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याऐवजी जिल्हा मध्यवर्ती बँक देवणी येथून स्वत:च्या लातूर येथील अॅक्सीस बँकेत वळती केली आहे़ हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी देवणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी अजीत रासुरे याच्याविरुध्द कलम ४०९ व ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचायत समितीत आठ लाखांचा अपहार
By admin | Updated: October 15, 2016 00:51 IST