शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

ईद उत्साहात; पाऊस, शांततेसाठी प्रार्थना

By admin | Updated: July 8, 2016 00:35 IST

उस्मानाबाद : शहरासह जिल्हाभरात गुरूवारी मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी सामुहिक नमाज अदा करण्यात आली

उस्मानाबाद : शहरासह जिल्हाभरात गुरूवारी मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी सामुहिक नमाज अदा करण्यात आली. यानंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.उस्मानाबाद येथील ईदगाह मैदानावर सकाळी सामुहिक नमाज अदा करण्यात आली. यात शेकडो समाजबांधव उपस्थित होते. नमाज अदा केल्यानंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील, रा. प. महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, आ. राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष संपत डोके, अमोल पाटोदेकर, माजी आ. ओम राजेनिंबाळकर, विश्वासराव शिंदे, सुरेश देशमुख, संजय पाटील दुधगावकर यांच्यासह इतर विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीनेही पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक दीपाली घाडगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर दिवसभर मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शुरखुर्मा व गुलगुल्यांचा आस्वाद घेतला.परंडा शहरातील ईदगाह मैदानावर शहर काझी जफर मौलाना यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक नमाज पार पडली. यावेळी मौलाना जफर काझी यांनी रमजान ईदचे महत्व सांगितले. नमाज झाल्यानंतर मौलाना जफर काझी यांनी जगात व देशात शांतता नांदावी, भाईचारा वाढावा, सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, मुबलक पाऊस पडावा अशी प्रार्थना अल्लाहकडे केली. यानंतर मुस्लिम बांधवाना पोलिसांच्या वतीने पो.नि.डंबाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुलाब पुष्प देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नायब तहसीलदार गणेश पवार, जुल्फेकार काझी, समीर पठाण, हाजी नुरुद्दीन चौधरी, जमील शेख, गौसोद्दीन काझी आदी उपस्थित होते. ईदनिमित्त हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देवून एकमेकांना गळा भेटी दिल्या.उमरगा शहरातही रमजान ईद हा सण उत्साहात पार पडला. यानिमित्त शहरातील गुंजोटी रोडवरील ईदगाह मैदानावर हजारो बांधवांनी ईदची नमाज अदा केली. बुधवारी संध्याकाळी ईदचा चाँद दिसल्यानंतर उमरगा शहरात मुस्लीम बांधवानी खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केली होती. नमाज अदा करून आलेल्या मुस्लिम बांधवाना ईदगाह मैदानाबाहेर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा बँकेचे चेअरमेन सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष संजय पवार, सुनील माने, बालाजी पाटील, आमोल पाटील, बापू बिराजदार तसेच शिवसेनेच्या वतीने युवा नेते किरण गायकवाड, नगराध्यक्ष धनंजय मुसांडे, नगरसेवक नारायण सुरवसे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक रझाक अत्तार आदी उपस्थित होते. वाशी येथे तांदुळवाडी रोडवरील ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा करण्यात आली. भूम शहरातील वाशी रोडवर ील ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पार पडली. या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)