शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराबरोबर समुपदेशनाने परावलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न; घाटीतील वार्धक्यशास्त्र विभागाने ज्येष्ठांना दिला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 19:35 IST

विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

औरंगाबाद : घाटीत बाह्यरुग्ण विभाग, ‘आयसीसीयू’, ‘एमआयसीयू’मध्ये दाखल होणाऱ्या ज्येष्ठांचे प्रमाण अधिक आहे. ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या सर्व आजारांवरील उपचारासाठी घाटी रुग्णालयाने वार्धक्यशास्त्र (जेरियाट्रिक्स) विभागाच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) एमडी-वार्धक्यशास्त्र (जेरियाट्रिक्स) विषयात पदव्युत्तर या अभ्यासक्रमाची मंजुरी मिळविणारे घाटी रुग्णालय राज्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर देशातील तिसरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे. ‘जेरियाट्रिक्स’च्या या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने १७ जुलै २०१७ रोजी ‘एमसीआय’कडून पाहणी झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळाली.

एकूण तीन जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. वृद्धांची सर्वांगीण काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार घेण्यासाठी, समुपदेशन, नातेवाईकांनी त्यांची अधिक काळजी कशी घ्यायची, यादृष्टीने हा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. घाटीत २७ जुलै रोजी वार्धक्यशास्त्र विभागाच्या वॉर्डाचे उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी ३० खाटांची सुविधा आहे. गेल्या काही दिवसांत १९ महिला आणि २० पुरुष ज्येष्ठांवर उपचार करण्यात आले. परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर हा वॉर्ड पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.

वृद्ध व्यक्तींना वयोमानानुसार मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, फॅक्चर, लघुशंकेवरील नियंत्रण कमी होणे, दमा,  पॅरेलेसिस यासह विसरभोळेपणा, स्मृतिभ्रंश, हात थरथरणे, बडबड करणे, एकटेपणा, नैराश्य येणे आदी आजारांना सामोरे जावे लागते. मानसिक  समुपदेशन करून त्यांचे परावलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न या विभागाद्वारे केले जात आहेत. देशात २० प्रादेशिक वार्धक्यशास्त्र केंद्र मंजूर झालेले आहेत. यामध्ये सध्या दोन महाराष्ट्रात आहेत. तिसरे केंद्र औरंगाबादला मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुनर्वसन केंद्र अथवा प्रशिक्षण केंद्रही मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आगामी कालावधीत केंद्रवार्धक्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर म्हणाल्या, मुंबईत २०१२ मध्ये जेजे हॉस्पिटल येथे प्रादेशिक वार्धक्यशास्त्र केंद्र सुरू झालेले आहे. तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या नागपूर येथील महाविद्यालयात हे केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. वृद्धांना विशेष उपचार देण्यासाठी औरंगाबादेत हे केंद्र हवे, असा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी घाटी प्रशासनातर्फे देण्यात आला. घाटी रुग्णालयासही आगामी कालावधीत हे केंद्र मिळेल, अशी आशा आहे.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीयmedicineऔषधं