शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणातील ‘अंडरकरंट’ प्रवाहित करण्यासाठी बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:31 IST

वैयक्तिक पातळीवर एसएमएस, नातेवाईक, पाहुणे या माध्यमातून बैठकीसाठी निमंत्रित केले जात आहे.

ठळक मुद्देशांतीगिरी महाराजांच्या भूमिकेकडे लक्ष  समाज म्हणून ठोस निर्णय घेण्याबाबत विचारमंथन

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २१ तारखेपर्यंत प्रचाराची मुदत असून, ११ दिवस प्रचारासाठी राहिलेले आहेत. यादरम्यान ‘अंडरकरंट’ राजकारणासाठी बैठकींचे नियोजन करण्यात येत असून, मराठा समाजाने त्यामध्ये आघाडी घेतली आहे. समाज म्हणून ठोस निर्णय घेण्याबाबत बैठकांमध्ये विचारमंथन होत आहे. विशेष करून वैयक्तिक पातळीवर एसएमएस, नातेवाईक, पाहुणे या माध्यमातून बैठकीसाठी निमंत्रित केले जात आहे.

बैठकींचे सत्र सध्या ग्रामीण भागात सुरू आहे. शहरामध्ये पुढच्या आठवड्यापासून तयारी करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक आणि समाज या पार्श्वभूमीवरच या बैठकांचे नियोजन करण्यात येत असल्याची चर्चा आहे. या सगळ्या बैठकांच्या सत्रामध्ये शांतीगिरी मौनगिरी महाराजांच्या भूमिकेकडे राजकीय पक्षांतील प्रमुख उमेदवारांचे लक्ष लागले आहे. महाराज आणि जय बाबाजी परिवाराचे सर्व समाज समावेशक भक्त आहे. त्यामुळे महाराज काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. इतर समाज मतदारांच्या देखील छोटेखानी बैठका होत आहेत. त्यामध्येदेखील लोकसभा निवडणुकीचा अजेंडा राबविण्याबाबत चर्चा होत असल्याचे ऐकिवात आहे. 

शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांतील मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या जरी आपापल्या पक्षाचे उपरणे घालून उमेदवारांचा प्रचार करीत असले तरी समाज म्हणून त्यांनाही बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. बैठकांचे स्वरूप व्यापक नसून छोटेखानीच असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वानुमते मोठा समाज मेळावादेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

महाराजांनी अजून निर्णय घेतलेला नाहीशांतीगिरी मौनगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याची चर्चा सोशल मीडियात होती. याबाबत प्रचारप्रमुख राजेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महाराजांनी अजून काहीही निर्णय घेतलेला नाही. महाराज पाठिंबा देण्याबाबत जाहीरपणे भूमिका मांडणार आहेत. सोशल मीडियातील माहिती चुकीची असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Politicsराजकारण