बीड : खासगी शाळेत अतिरिक्त ठरलेल्या एका शिक्षकास रुजू करुन घेण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (मा.) लता सानप यांनी दिले होते;पण ज्या शाळेत ते अतिरिक्त ठरले त्या शाळेसह धारुर येथील शाळेनेही त्यांना थारा दिला नाही. रविवारी ही माहिती पुढे आली.आर. आर. जाधव हे बीड तालुक्यातील नामलगाव येथील लक्ष्मणराव जाहेर पाटील माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. २०१३- १४ च्या संचमान्यतेनुसार ते अतिरिक्त ठरले. जाधव यांना धारुर येथील सरस्वती विद्यालयात समायोजन करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले होते. मात्र, तेथील शाळेने जाधव यांना रुजू करुन घेतले नाही.त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी १७ एप्रिल रोजी लक्ष्मणराव जाहेर पाटील विद्यालयास पत्र पाठवून सद्यस्थितीत जाधव यांना रुजू करुन आस्थापनेवरुन त्यांचे वेतन व भत्ते काढण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार रुजू होण्यास गेल्यावर मुख्याध्यापक पी. आर. कळासे यांनी त्यांना रुजू तर करुन घेतलेच नाही याउलट धमकावले, अशी तक्रार जाधव यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला टोपली
By admin | Updated: April 20, 2015 00:35 IST