शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

ग्रामस्थाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लाईनमनला शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:10 IST

डीपी बदलण्यासाठी मदतीला गेलेल्या ग्रामस्थाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ग्रामस्थाच्या ‘मृत्यूस कारणीभूत ठरल्या’च्या आरोपाखाली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी लाईनमन विष्णू वाघला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डीपी बदलण्यासाठी मदतीला गेलेल्या ग्रामस्थाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ग्रामस्थाच्या ‘मृत्यूस कारणीभूत ठरल्या’च्या आरोपाखाली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी लाईनमन विष्णू वाघला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.औरंगाबाद तालुक्यातील करजंगाव शिवारातील रावसाहेब बोराडे यांच्या शेतातील विजेची डीपी जळाली होती. ती दुरुस्त करावी किंवा नवीन डीपी बसविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी गाढेजळगाव येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात केली होती. त्या कार्यालयातील लाईनमन विष्णू श्यामराव वाघ यांनी नवीन डीपी बसवावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे गावात वर्गणी गोळा करण्यात आली. जमा झालेल्या पैशातून डीपी घेण्यात आली. ११ नोव्हेंबर रोजी लाईनमन विष्णू वाघ डीपी घेऊन गावात आला. त्याने डीपीवर चढवण्यासाठी मदतीला येण्याचे आवाहन केल्यामुळे आठ ते दहा जण आले. शिवारातील नादुरुस्त डीपी काढण्यासाठी चंद्रभान पुंजाराम बोरुडे आणि सुभाष भेरे हे दोघेजण खांबावर चढले. तत्पूर्वी या दोघांनी लाईनमन वाघ यास वीज बंद आहे का अशी विचारणा केली असता वाघने वीजपुरवठा बंद आहे, असे सांगितले. दरम्यान वर चढलेले चंद्रभान बोरुडे यास वरच्या विजेच्या तारेला उलटा हात लावून बघ वीज बंद आहे का? असे सांगितले. चंद्रभान याने विजेच्या तारेस उलटा हात लावताच त्याला विजेचा धक्का लागला. यामध्ये त्याचे दोन हात आणि डाव्या पायाची मांडी जळाली आणि तो खाली कोसळला. गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे तो जागीच मरण पावला असल्याचे पुंजाराम बोरुडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून करमाड पोलीस ठाण्यात लाईनमन वाघ विरोधात भादंवि कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक ए. बी. धडबे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.सुनावणीवेळी सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये लाईनमन दोषी आढळल्यामुळे त्याला शिक्षा सुनावण्यात आली.