शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतुकीसाठी १ जूनपासून ‘ई-वे बिल’ सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:40 IST

आंतरराज्य व राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी ई-वे बिल प्रणाली सुरू झाली आहे. महाराष्ट्रात १ जूनपासून राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी ई-वे बिल सक्तीचे करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराज्यांतर्गत ई-वे बिलची अंमलबजावणी यापूर्वी दोनदा पुढे ढकलण्यात आली. आता १ जूनपासून राज्यांतर्गत ई-वे बिलची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

औरंगाबाद : आंतरराज्य व राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी ई-वे बिल प्रणाली सुरू झाली आहे. महाराष्ट्रात १ जूनपासून राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी ई-वे बिल सक्तीचे करण्यात येणार आहे. या इलेक्ट्रॉनिक्स बिलची प्रणाली संपूर्णपणे पारदर्शक व सुटसुटीत आहे.  राज्याच्या सीमेवर चेकपोस्ट नसल्याने परराज्यांत माल पाठविण्याचा कालावधी निम्म्यावर येणार आहे. यामुळे उत्पादक, व्यापारी मालवाहतूकदारांचा वेळ व पैशांंची मोठी बचत होणार असल्याची माहिती केंद्रीय जीएसटी विभागाचे सहआयुक्त अशोककुमार यांनी दिली. 

राज्यांतर्गत ई-वे बिलची अंमलबजावणी यापूर्वी दोनदा पुढे ढकलण्यात आली. मात्र, आता १ जूनपासून राज्यांतर्गत ई-वे बिलची अंमलबजावणी सुरू होणार आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत अशोककुमार यांनी सांगितले की, देशभरात वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू आहे. आता करचुकवेगिरीला आळा बसण्यासाठी आंतरराज्य ई-वे-बिल प्रणाली देशात लागू करण्यात आली आहे. पूर्वी जेथे ८६ हजार कोटी महसूल मिळत होता तेथे ई-वे बिल लागू झाल्यानंतर १ लाख कोटींपेक्षा अधिक कर शासनाला मिळाला आहे. यावरून पूर्वी करचोरी किती मोठ्या प्रमाणात होत असे, याचा अंदाज येऊ शकतो.

१ एप्रिलपासून कर्नाटक, २० एप्रिलपासून बिहार, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा व उत्तराखंड व २५ एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेश, मध्यप्रदेश, मेघालय, सिक्कीम व पुडुचेरी येथे राज्यांतर्गत ई-वे बिल सुरू झाले आहे. महाराष्ट्रात १ जूनपासून राज्यांतर्गत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की,  उत्पादकांना, व्यापाऱ्यांना ५० हजारांपेक्षा अधिक माल परपेठेत पाठविण्यासाठी  ई-वे बिल लागणार आहे. संपूर्ण ई-वे बिल प्रणाली एवढी सुटसुटीत आहे की, मोबाईलवरूनही व्यापाऱ्यांना ई-वे बिल निर्मित करता येऊ शकते. उत्पादक व व्यापाऱ्यांनी या नवीन मालवाहतूक प्रणालीचे सकारात्मक  स्वागत करावे. ई-वे बिलमध्ये काही समस्या येत असल्यास सिडकोतील केंद्रीय जीएसटी विभागात संपर्क करावा. येथे समस्या सुटली नाही तर जीएसटीएन कौन्सिलकडे आम्ही ती समस्या पाठवू, असे आश्वासन अशोककुमार यांनी दिले. 

‘पार्ट टू’मध्ये बदल करता येऊ शकतोकेंद्रीय जीएसटी विभागाचे अधीक्षक डी. आर. गुप्ता यांनी सांगितले की, ई- वे बिलमध्ये पार्ट वन व पार्ट टू, असे दोन भाग आहेत. पार्ट वनमध्ये उत्पादनाची संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. ही माहिती बदलू शकता येणार नाही. पार्ट टूमध्ये मालवाहतुकीची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. मात्र, अपघात, गाडी फेल होणे किंवा अन्य कारणांमुळे गाडी एका जागेवर ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबल्यास पार्ट टूमध्ये बदल करता येऊ शकतो. ई-वे बिल निर्मिती केल्यावर १२ अंकी नंबर प्राप्त होणार आहे. 

या वस्तूंसाठी ई-वे बिलची आवश्यकता नाही १) चलन, २) गॅस सिलिंडर २)  रॉकेल ३) पेट्रोल, डिझेल ४) पोस्टाद्वारे वाहतूक होणाऱ्या पोस्टल बॅग्ज  ५) मोती, हिरे, सोने, चांदी, दागिने ६)  वापरलेले घरगुती साहित्य, उपकरणे आदी. 

सायकल, बैलगाडीने माल आणला तर...मुंबईहून वाळूजपर्यंत मालवाहतूक केल्यास ई-वे बिल लागणार आहे. तेथून ५० हजारांपेक्षा अधिक माल शहरात दुचाकी, लोडिंग रिक्षाने आणल्यास ई-वे बिल लागेल, पण तोच माल सायकल, हातगाडी किंवा बैलगाडीने शहरात आणल्यास त्यास ई-वे बिल लागणार नाही. 

टॅग्स :billबिलbusinessव्यवसायGSTजीएसटीGovernmentसरकार