शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उतारवयात 'ई-मेल' ची सक्ती; जेष्ठ नागरिकांना करकपातीचा आॅनलाईन अर्ज भरणे ठरतेय त्रासदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 20:31 IST

‘डिजिटल इंडिया’चे वारे देशभरात जोरात वाहत असले तरी अनेक ज्येष्ठ नागरिकांना मात्र या सर्व गोष्टी अडचणीच्या आणि त्रासदायक वाटत आहेत.

ठळक मुद्देनिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना करकपातीची सवलत मिळण्यासाठी १५ एच हा अर्ज भरावा लागतो. यंदा हा अर्ज आॅनलाईन स्वरूपातच भरण्यात यावा, असे आदेश रिझर्व्ह बँकेकडून सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आले आहेत. 

औरंगाबाद : ‘डिजिटल इंडिया’चे वारे देशभरात जोरात वाहत असले तरी अनेक ज्येष्ठ नागरिकांना मात्र या सर्व गोष्टी अडचणीच्या आणि त्रासदायक वाटत आहेत. १५ एच या अर्जासाठी स्वत:चा ई- मेल असणे आवश्यक झाल्यामुळे आता उतारवयात हा ‘आॅनलाईन’ अर्ज भरणे ज्येष्ठांसाठी जिकिरीचे ठरतेय.

निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना करकपातीची सवलत मिळण्यासाठी १५ एच हा अर्ज भरावा लागतो. यंदा हा अर्ज आॅनलाईन स्वरूपातच भरण्यात यावा, असे आदेश रिझर्व्ह बँकेकडून सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आले आहेत. यानुसार आता हा अर्ज भरावयाचा असेल तर ज्येष्ठांनी त्यांचा ई- मेल आयडी बँकेत नोंदविणे गरजेचे आहे. मेल आयडीची बँकेत नोंद केल्यानंतर त्या मेल आयडीवरच ज्येष्ठांना १५ एच फॉर्म पाठविण्यात येईल. त्यानंतर ज्येष्ठांनी हा फॉॅर्म आॅनलाईन भरूनच पाठवायचा आहे. 

ई- मेल आयडी तयार करणे ज्येष्ठांना जिकरीचे वाटत असेल, तर नेट कॅफे येथे जाऊन ज्येष्ठांनी आयडी तयार करावा आणि बँकेत नोंद करावा, असे अनेक बँकांच्या शाखा व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, बँकेच्या या कामासाठी आम्ही आमचा ई- मेल आयडी तयार केला तरी आलेला ई- मेल पाहण्यासाठी आमच्याकडे संगणक नाही, अशी अडचण काही ज्येष्ठांनी सांगितली. उतारवयात आम्हाला संगणक हाताळणेही जिकरीचे वाटते. आमच्यापैकी बहुतांश लोकांकडे त्यांचे ई- मेल आयडी नाहीत. त्यामुळे ही गोष्ट आमच्यासाठी अडचणीची ठरत असून, निदान ज्येष्ठांसाठी तरी या नियमात बदल करावा, अशी अपेक्षा ७८ वर्षीय निवृत्ती वेतनधारक शांतीलाल सुरेका यांच्यासह अनेक ज्येष्ठांनी व्यक्त केली.

बँकांमध्ये संगणक सहायता कक्ष हवा७० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांच्या नोकरीच्या काळात मोठ्या प्रमाणावर संगणक क्रांती झालेली नसल्यामुळे या ज्येष्ठांना संगणक वापरण्याची भीती वाटते. याशिवाय या वयात अशा तांत्रिक गोष्टी शिकून त्या आत्मसात करण्याची ज्येष्ठांची क्षमताही कमी होत जाते. ही गोष्ट समजून घेऊन अर्ज आॅनलाईन पद्धतीनेच भरावयाचा असेल तर ज्येष्ठांसाठी बँकांमध्ये सहायता कक्ष स्थापन करून तेथे त्यांचा ई-मेल आयडी तयार करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही पुढे येत आहे.

टॅग्स :digitalडिजिटलbankबँकTaxकर