लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : जनावरांसाठी बांधलेल्या पाण्याच्या हौदात पडल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वरवंटी येथे मंगळवारी सायंकाळी घडली. खानापूर येथील अक्षय बल्लाळ हे वरवंटी येथे सुधीर पाटील यांच्या शेतात काम करतात. तेथे ते कुटुंबीयासह वास्तव्यास आहेत. मंगळवारी त्यांचा दीड वर्षांचा मुलगा देवराज हा घरासमोर खेळत असताना जनावरांना पाणी पिण्यासाठी खोदलेल्या खड्ड्याकडे गेला. खेळत-खेळत तो या खड्ड्यात पडला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याच्या आज्जीने त्याला खड्ड्यातून बाहेर काढले. यानंतर उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हौदात बुडून चिमुकल्याचा मृत्यू
By admin | Updated: June 1, 2017 00:42 IST