शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

धुळ, प्रदूषण, पर्यटकांच्या गर्दीने अजिंठा लेणीतील चित्रे संवर्धनाचे आव्हान

By संतोष हिरेमठ | Updated: April 13, 2023 19:09 IST

बाग लेणीप्रमाणे अजिंठा लेणीतील पेंटिंग काढून संवर्धन करण्याची वेळ येणार नाही

छत्रपती संभाजीनगर : मध्य प्रदेशातील बाग लेणीतील चित्रे काढून म्युझियममध्ये ठेवण्याची वेळ आली. तेथील खडकाच्या परिस्थितीमुळे ही वेळ आली. परंतु अजिंठा लेणीतील खडक वेगळा आहे. धुळ, प्रदूषण, पर्यटकांच्या गर्दीने अजिंठा लेणी पेंटिंग संवर्धनाचे आव्हान आहेच. परंतु बाग लेणीप्रमाणे अजिंठा लेणीतील पेंटिंग काढून संवर्धन करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे संचालक (सायन्स) राम निगम म्हणाले.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणातर्फे ‘वैज्ञानिक संवर्धन आणि पेंटिंगचे जतन’ याविषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचे बुधवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी गर्व्हमेंट फाॅरेन्सिक सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक डाॅ. उल्हास पाटील, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, जबलपूर येथील पुरातत्व अधीक्षक शिवकांत बाजपेयी, इंदूर येथील पुरातत्व रसायनशास्त्र अधीक्षक दिनेशकुमार वर्मा, म्हैसूर येथील पुरातत्व रसायनशास्त्र अधीक्षक मांगीराम, छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा, पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ उपअधीक्षक डाॅ. एस. विनोद कुमार, डॉ. राजेश रगडे आदी उपस्थित होते.

राम निगम म्हणाले, अजिंठा लेणी संरक्षणाचे काम केले जात आहे. हे काम अधिक चांगल्याप्रकारे होण्यासाठी ही कार्यशाळा महत्वपूर्ण ठरेल. जुन्या पद्धतीनेही चांगल्याप्रकारे काम करीत आहोत. मात्र, नवीन यंत्रसामुग्री, साहित्य वापरून हे काम अधिक चांगल्याप्रकारे होईल.

गर्दीचा डेटाही माॅनिटर करूपर्यटकांची संख्या ही सर्वात मोठे आव्हान आहे. वारसा पाहण्यासाठी पर्यटक आले पाहिजे. त्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. पर्यटक श्वास घेतात. तेव्हा ऑक्सिजन घेतात आणि कार्बनडाय ऑक्साइड सोडतात. त्यातून आर्द्रता वाढतो. परंतु तिकीट विक्री मर्यादित करून पर्यटकांची संख्या कमी करणे हा सध्या तरी पर्याय नाही. पेंटिंगच्या सुरक्षेसाठी पर्यटकांच्या गर्दीचा डेटाही माॅनिटर केला जाईल. पेंटिंगमध्ये, कलाकृतीत कोणते साहित्य आहे, हे शोधणारी यंत्रसामुग्री आली आहे. कमीत कमी हस्तक्षेप करून पेंटिंगचे संवर्धन करण्यावर भर आहे. पेंटिंग असो अथवा कलाकृती. त्याची हाताळणी करताना ते खराब होण्याचीही शक्यता असते.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabadऔरंगाबाद