शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियातून पदवीधर निवडणूक प्रचाराचा धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 13:06 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितेत सोशल मीडियासाठी जे निकष लावण्यात आले होते, तेच निकष या निवडणुकीसाठी देखील आहेत.

ठळक मुद्दे व्हायरल पोस्टमधून आचारसंहितेचे उल्लंघन करणारा प्रचार मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या कुरुक्षेत्रात ३५ उमेदवार

औरंगाबाद : सोशल मीडियातून (समाज माध्यम) मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराचा धुराळा उडतो आहे. हा प्रचार सर्व उमेदवारांच्या समर्थकांमार्फत केला जात असून, त्यात आचारसंहितेचे नियम पाळले जात आहेत की नाहीत, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितेत सोशल मीडियासाठी जे निकष लावण्यात आले होते, तेच निकष या निवडणुकीसाठी देखील आहेत. असे असताना एक्झिट पोल घेणे, उमेदवारांच्या पोस्टवर टीका करणे, कोण होणार आमदार, म्हणून सर्व्हे करण्याचे प्रकार समोर येत आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजांनी केलेल्या पोस्ट व्हायरल होऊन त्यातूनही आचारसंहितेचे उल्लंघन करणारा प्रचार होताना दिसतो आहे.  यावर सोशल मीडियावर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखालील समिती दुर्लक्ष करीत असल्याचे सध्या तरी दिसते आहे. सोशल मीडियातील प्रचाराबाबत तक्रार आली तरच समिती दखल घेऊन कारवाई करते, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. अद्याप सोशल मीडियातील प्रसाराबाबत एकही तक्रार आली नसल्याचेही समितीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या कुरुक्षेत्रात ३५ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. औरंगाबादमधील १४ उमेदवार, बीड जिल्ह्यातील ८, तर उर्वरित १३ उमेदवार पुणे, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील आहेत. यंदाच्या निवडणुकीत विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवार मैदानात आहेत. सर्वाधिक उमेदवार औरंगाबाद जिल्ह्यातील असून त्याखाली बीड जिल्ह्यांतून उमेदवार आहेत. असे असले तरी खरी लढत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये होत आहे. प्रमुख उमेदवार प्रत्यक्ष प्रचारासह सोशल मीडियातही अग्रेसर आहेत. समर्थकांच्या माध्यमातून विविध पोस्ट, मजकूर, छायाचित्रे सोशल मीडियात फॉरवर्ड केली जात आहेत. त्याशिवाय इतरही उमेदवारांचा सोशल मीडियातून प्रचार सुरू आहे. 

निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती अशी या निवडणुकीचे निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, या निवडणुकीत सोशल मीडियासाठी आचारसंहितेचे काय नियम आहेत, ते बघावे लागेल.

मराठवाड्यात ३५ उमेदवारांत लढतमराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या कुरुक्षेत्रात ३५ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. औरंगाबादमधील १४ उमेदवार, बीड ८, तर उर्वरित १३ उमेदवार पुणे, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील आहेत. यंदा प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवार मैदानात आहेत. सर्वाधिक उमेदवार औरंगाबाद जिल्ह्यातील असून त्याखाली बीड जिल्ह्यांतून उमेदवार आहेत. असे असले तरी खरी लढत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये होत आहे. प्रत्येक उमेदवाराचा सोशल मीडियातून प्रचार सुरू आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकSocial Mediaसोशल मीडियाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय