जालना : गेल्या महिनाभरापर्यंत बाजारपेठेत असलेल्या मंदीच्या परिस्थितीला आता निवडणुकांमुळेच दिलासा मिळाला आहे. प्रचारासाठी लागणाऱ्या साहित्यापासून अगदी पिण्याच्या पाऊचपर्यंत विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने बाजारपेठेतील व्यवहार सध्या तेजीत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच राजकीय कार्यकर्ते, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांनीही दसरा सण हर्षोल्हासात साजरा केला. आता दिवाळीचेही वेध लागले असून त्यासाठीची तयारी सुरू आहे.राज्यात युती व आघाडी संपुष्टात आल्याने प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची संख्याही वाढली आहे. परिणामी मतदारसंघात निवडणुकीसाठी उमेदवारांकडून होणारा खर्चही वाढला आहे. प्रचारासाठी टोप्या, रूमाल, टी शर्ट, झेंडे, बॅनर्स, वाहने इत्यादींची गरज भासते. त्याचबरोबर रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना पाण्याचे पाऊच, चहा एवढेच नव्हे तर काही ठिकाणी जेवणही दिले जात आहे. त्यामुळे हॉटेल्स, ढाब्यांवरील वर्दळ वाढली आहे.बाजारपेठेत पैसा खेळता राहू लागल्याने सर्वसामान्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनाच त्याचा काही ना काही फायदा होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दसऱ्याचा सण हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. आता दिवाळीचेही वेध लागले असून तीही अत्यंत हर्षोल्हासात जाईल, असे चित्र आहे.(प्रतिनिधी)
दसरा हर्षोल्हासात...आता दिवाळीचे वेध
By admin | Updated: October 6, 2014 00:12 IST