शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शहराला डेंग्यूचा ‘डंख’

By admin | Updated: September 11, 2016 01:24 IST

औरंगाबाद : शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूने अक्षरश: थैमान घातले आहे. प्रत्येक दहापैकी दोन घरांमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत.

औरंगाबाद : शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूने अक्षरश: थैमान घातले आहे. प्रत्येक दहापैकी दोन घरांमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील लहान मोठ्या रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. ब्लड बँकांमध्ये प्लेटलेटस् मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी रांगा लावल्या आहेत. एवढे असूनही महापालिका प्रशासन ठोस उपाययोजना करायला तयार नाही.शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर डेंग्यूने कहरच केला आहे. रुग्णांना घाटीसह वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. घाटी रुग्णालयात सध्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये यश विनोद वरकड (५४, सादातनगर), सूरज श्याम बनकर (१२, सिद्धार्थनगर, हडको), परमेश्वर कड, मंगेश साळवे (२७, मयूर पार्क), नुसरत शेख (२०- एन-९), हेमंत बिस्वास (२३, न्यायनगर) यांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी लेबर कॉलनी येथील साडेपाच वर्षीय माहिम सुलताना मीर असिफ अली या चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला.डॉक्टरांनी काळजी घ्यावीशहरात प्लेटलेटस्ची वाढती मागणी लक्षात घेऊन डॉक्टरांनीही थोडीशी काळजी घ्यावी, असे आवाहन दत्ताजी भाले रक्तपेढीचे डॉ. महेंद्रसिंह चव्हाण यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानकानुसार ज्या रुग्णाचे प्लेटलेटस् १० हजारांपर्यंत येत नाहीत, तेव्हापर्यंत प्लेटलेटस् देण्याची घाई करू नये. अनेक डॉक्टर २० हजारांपर्यंत प्लेटलेटस् येताच मागणी करतात. काही रुग्णांचे प्लेटलेट झपाट्याने कमी होत असल्यास त्यांना त्वरित प्लेटलेटस् देणे गरजेचेही असते.डेंगीचा डासडेंगीचा एडिस इजिप्त हा डास घरातील स्वच्छ पाण्यावर वाढतो. त्यामुळे घरातील पाणी झाकून ठेवावे. घराच्या परिसरातील टायर, नारळाच्या करवंट्या यात पाणी साठून तेथे या डासांची उत्पत्ती होण्याचा धोका असतो. त्यामुळे परिसरातील अशा वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी. हा डास दिवसा चावत असल्याने हात आणि पाय झाकले जातील असे कपडे वापरावे. त्यानंतरही ताप आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले.डेंग्यूमुळे लहान मुलांना बराच फटका बसत आहे. लहान मुलांची रुग्णालयेही हाऊसफुल आहेत. डेंग्यूवर प्रभावी असे कोणतेच औषध आज तरी उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टर ताप कंट्रोलमध्ये आणणे, प्लेटलेटस् कमी जास्त होतात का एवढेच लक्ष ठेवून असतात. कारण डेंग्यूवर प्रभावी औषधी बाजारात उपलब्ध नसल्याचे डॉ. अभय जैन यांनी सांगितले.70 % नमुने पॉझिटिव्हशहरातील वेगवेगळ्या भागांत रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असून ७० ते ८० टक्के नमुने पॉझिटिव्ह ठरत आहेत. शहरात बऱ्यापैकी डेंग्यूने हातपाय पसरले आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये औषधोपचार व डेंग्यूच्या चाचणीसाठी रुग्णांना हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.१) पौष्टिक आहार घ्यावा. २) फळे, भाज्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. ३) आहारात साखरेचे प्रमाण कमी असावे. ४) शीतपेयांचे सेवन थांबवावे.५) फास्ट फूड, गोठवलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. ६) सी जीवनसत्त्वयुक्त लिंबू, संत्री, मोसंबी, लसूण खावेत.७) टोमॅटो, बोरं, टरबूज, गाजर, कोबी, पालक यांचे सेवन करावे. शनिवारी महापालिकेला सुटी असतानाही मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तातडीने आरोग्य विभागाची बैठक बोलावली. बैठकीत धूरफवारणी, औषधी फवारणी युद्धपातळीवर करा असे आदेश दिले. खाजगी डॉक्टरांच्या ‘आयएमए’ संघटनेने महापालिकेला डेंग्यू जनजागृतीसाठी व्यापक प्रमाणात साहित्य दिले आहे. या साहित्याचा वापर गणेशोत्सवात करावा, असे आदेशही त्यांनी दिले. शहरात ठिकठिकाणी शमशान परवाना देण्याची व्यवस्था करावी. घाटीत जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी मनपाची स्वतंत्र व्यवस्था करावी, असे आदेशही बकोरिया यांनी बैठकीत दिले.