आष्टी: शहरातील कमानवेस जवळील गादीच्या गोदामाला आग लागून शुक्रवारी लाखोंचे नुकसान झाले. ही घटना दुपारी १२ वाजता घडली. पिंजारी उस्मान अब्दुल गफूर यांचा कमानवेसनजीक मिलन गादी कारखाना आहे. दुपारी दुकान बंद करुन ते बाहेर गेले होते. यावेळी दुकानाच्या मागून आगीचे लोळ बाहेर पडू लागले. त्यानंतर आगी वेगाने पसरली. गादी बनविण्यासाठी आणलेला कापूस व तयार केलेल्या गाद्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. तहसीलदार रामेश्वर गोरे, नायब तहसीलदार विलास तरंगे, प्रदीप पांडूळे यांनी घटनास्थळी भेट दिली. अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पिंजारी यांनी सांगितले. आगीमागचे कारण समजू शकले नाही. (वार्ताहर)टँकरने विझवली आगपाणी घेऊन निघालेले खासगी टँकर नागरिकांनी दुकानाकडे नेण्याची विनंती केली. त्यानंतर टँकरचा पाईप लावून आग विझविली. त्यामुळे आग आटोक्यात आली आणि परिसरातील दुकाने बचावली.
गादी गोदाम आगीत खाक
By admin | Updated: April 16, 2016 00:06 IST