शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

नांदेड-पुणे गाडीला प्रशासनाचा खोडा

By admin | Updated: July 21, 2014 00:37 IST

नांदेड : नांदेड येथून पुण्यासाठी प्रायोगिक तत्वावर विशेष द्विसाप्ताहिक रेल्वे सोडली जात आहे़ या गाडीच्या स्लीपर कोचचे जवळपास सर्वच तिकीट आरक्षित होत असून शेवटच्या दोन दिवसांत तर वेटींग असते़

नांदेड : नांदेड येथून पुण्यासाठी प्रायोगिक तत्वावर विशेष द्विसाप्ताहिक रेल्वे सोडली जात आहे़ या गाडीच्या स्लीपर कोचचे जवळपास सर्वच तिकीट आरक्षित होत असून शेवटच्या दोन दिवसांत तर वेटींग असते़ पुणे गाडीला अशी गर्दी होत असतानाही रेल्वे प्रशासन पुण्यासाठी दररोज गाडी सोडण्याबाबत उदासीन असल्याचे चित्र समोर येत आहे़ नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रवाशांच्या मागणीनुसार दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने नांदेड ते पुणे एक्स्प्रेस जुलै महिन्यात गाडी क्रमांक ०७६२२-०७६२१ नांदेड येथून ७, ९, १४, १६, २१, २३, २८ व ३० जुलै रोजी पुण्यासाठी रात्री ९ वाजता तर पुण्याहून नांदेडसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पुणे स्थानकाहून गाडी सोडण्यात येत आहे़ या गाडीला प्रवाशांकडून मिळणाऱ्या प्रतिसाद लक्षात घेता पुण्यासाठी दररोज एक एक्स्प्रेस सोडण्यात यावी तसेच ही गाडी सकाळी ७ वाजेच्या अगोदर पुणे येथे पोहोचायला हवी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे़ ट्रॅव्हल्सचालकाकडून पुणे येथे जाणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी पुण्यासाठी दररोज एक्स्प्रेस गाडी सुरू करावी, अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीने अनेकवेळा लावून धरली आहेख़ाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत रेल्वेचे तिकीट अत्यल्प आहे़ त्याचबरोबर प्रवासही आरामदायी होतो़ मात्र, नांदेड येथून सोडली जाणारी गाडी पुणे येथे अवेळी पोहोचत असल्याने अनेकवेळा प्रवासी या गाडीकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे़ पुणे गाडी चालविण्यास उदासीन असलेले रेल्वे प्रशासन याचाच आधार घेत पुण्यासाठी आवश्यक तेवढे प्रवासी मिळत नसल्याचा अहवाल समोर करतात़ सध्या सुरू असलेली पुणे विशेष गाडी पुण्यामध्ये सकाळी किती वाजता पोहोचेल, याचा बेत नाही़ लूज टाईमच्या नावाखाली दोन ते तीन तास गाडी लेट केली जाते़ सदरील गाडी पूर्वीच्या नांदेड - पुणे शटलप्रमाणे वेळेत पोहोचावी, यासाठीचे नियोजन करणे गरजेचे आहे़ पुणे येथे गाडी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पोहोचल्यास या गाडीला निश्चितच गर्दी होईल, अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशांना आहे़ नांदेड-पुणे गाडीचे सर्वसाधारण तिकीट १४३ रूपये, स्लिपर- ३१५ रूपये, एसी-३ टायरचे ८५० रूपये तर एसी - २ टायरचे १२२५ रूपये तिकीट आहे़ तर खाजगी ट्रॅव्हल्सचालक गर्दीनुसार आपले तिकीट दर ठरवित प्रवाशांची आर्थिक लूट करतात़ सध्या एसी ट्रॅव्हल्ससाठी ७०० ते १२०० रूपये आणि नॉन एसीसाठी ५०० ते ८०० रूपये तिकीट घेतले जात आहे़ ट्रॅव्हल्स वेळेवर पोहोचत असल्याने बहुतांश प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करणे पसंद करीत आहेत़ रेल्वे प्रशासनाने पुणे गाडीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेवून सदरील गाडी पुणे येथे सकाळी लवकर पोहोचेल, अशा पद्धतीचे नियोजन करावे, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेचे अरूण मेघराज यांनी केली आहे़ २००४ मध्ये नांदेड - पुणे ही शटल गाडी पुणे येथे दहा तासांत पोहोचायची़ सध्या सुरू असलेल्या गाडीला पुणे गाठण्यासाठी तब्बल १४ तास लागत आहेत़ जाणीवपूर्वक वेळ वाढवून प्रवाशांना त्रास दिला जात आहे़ तसेच पुणे येथे सकाळी एकही फलाट रिकामा नसतो, हे रेल्वे प्रशासनाने पुढे केलेले कारण चुकीचे असल्याचे मेघराज यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)