शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत उभी फुट पडली, दिग्गज गेले; दुसऱ्या फळीतील निष्ठावंतांना आता आमदारकीचे डोहाळे

By बापू सोळुंके | Updated: August 20, 2022 18:37 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जिल्ह्यातील पाच आमदार गेले आहेत.

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटात जिल्ह्यातील पाच आमदारांसोबत त्यांचे समर्थक पदाधिकारीही गेले आहेत. यामुळे शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाच आमदार बाहेर पडल्याने त्यांच्या मतदारसंघातील दुसऱ्या फळीतील निष्ठावंतांना आता आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहेत.

शिंदे गटासोबत कोण कोण गेले?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जिल्ह्यातील पाच आमदार गेले आहेत. या आमदारांचे समर्थक असलेले पक्षातील विविध पदाधिकारीही त्यांच्यासोबत गेले आहेत. यात जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, फुलंब्री तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, माजी उपमहापौर तथा युवासेना राज्य उपसचिव राजेंद्र जंजाळ, कन्नड तालुकाप्रमुख केतन काजे, सिल्लोड तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, पैठण तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, उपजिल्हाप्रमुख विनोद बाेंबले, वैजापूर उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, शहराध्यक्ष राजेंद्र साळुंके.

उद्धव यांच्यासोबत कोण राहिले?शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार किशनचंद तणवाणी, शहर संघटक राजू वैद्य, ज्ञानेश्वर डांगे, विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात. माजी महापौर नंदू घोडेले.

विधानसभेला चित्र आणखी बदलणार२०१९ साली झालेली विधानसभा निवडणूक शिवसेनेने भाजपसोबत युती करून लढविली होती. मागील निवडणुकीत शिवसेनेने सहा तर भाजपचे तीन आमदार विजयी होत जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या. सेनेच्या सहापैकी पाच आमदार शिंदे गटात गेले. त्यांच्यासोबत समर्थकांनीही त्यांना पाठिंबा दिल्याने आगामी विधानसभा निवडणूक शिवसेनेसाठी जड जाण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघापैकीत पैठण, सिल्लोड येथे शिवसेनेकडे ताकदवान उमेदवारच नसल्याचे बोलले जात आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना कितव्या स्थानावर? विधानसभा             कितवा क्रमांकपैठण- पहिल्या क्रमांकावरवैजापूर- पहिल्या क्रमांककन्नड- पहिला क्रमांकसिल्लोड- पहिला क्रमांकऔरंगाबाद-मध्य- पहिला क्रमांकऔरंगाबाद पश्चिम- पहिला क्रमांकफुलंब्री-भाजपऔरंगाबाद पूर्व-भाजपगंगापूर- भाजप

शिंदे गटाचे वर्चस्व असेलआगामी निवडणुका या भाजपसोबत युती करूनच लढल्या जातील, असे संकेत वरिष्ठांकडून मिळालेले आहेत. जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदार आमच्यासोबत आहेत. शिवाय सेनेसह विविध पक्षातील नेतेही शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचेच वर्चस्व असेल.- राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख शिंदेगट, शिवसेना.

शिवसेना दोन जागा अधिक जिंकेलजिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पाच आमदार विजयी झाले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत या पाच जागांवर आमचे उमेदवार निवडून येतीलच, शिवाय गंगापूर आणि औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघही आम्ही जिंकू. यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड असेल.- आ. अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख विरोधी पक्षनेते

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAmbadas Danweyअंबादास दानवे