लोकमत न्यूज नेटवर्कअंभोरा : अल्पवयीन मुलीच्या लग्नाला विरोध करणाऱ्या पित्याला धारदार शस्त्राने मारहाण केल्याची घटना खडगव्हाण फाटा येथे शनिवारी उघडकीस आली.नारायण रामभाऊ करांडे (रा. बोरुडी, ता. आष्टी, ह.मु. पांडेसरा, सुरत गुजरात) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलीसाठी गजराबाई हरिभाऊ थोरवे (रा. सोलापूरवाडी, ता. आष्टी) हिने स्थळ आणले होते. करांडे यांनी आताच लग्न करावयाचे नाही असे सांगितले, तेव्हा त्यांना धारदार शस्त्र व दगडाने मारहाण करण्यात आली. यात ते जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गजराबाई थोरवेसह शिवाजी हरिभाऊ थोरवे, सुलभा नारायण करांडे व दोन अनोळखी व्यक्तींवर अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
लग्नास विरोध केल्यामुळे पित्यास बेदम मारहाण
By admin | Updated: May 21, 2017 23:51 IST