लातूर : सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉ़ किरण जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी लातूरच्या सर्वोपचार रूग्णालयातील मार्डच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी संप केला़ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आंदोलनामुळे बाह्यरूग्ण विभागातील रूग्णांची मोठी गैरसोय झाली़ निवासी डॉक्टरांनी सोलापूर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी आंदोलन केले़ डॉ़ किरण जाधव हे निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते़ १६ आॅगस्ट रोजी शासकीय रूग्णालयातील बालरोग विभागातील वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली़ गेल्या ५ वर्षातील सोलापुरातील ही तिसरी घटना आहे़ त्यामुळे आम्ही संप करण्याचा निर्णय घेतल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ़ विजय नालपे यांनी सांगितले़ संपात डॉ़ हर्षल येरकाडे, डॉ़ श्रीजित पाणीकर, डॉ़ रेणूका घताळे, डॉ़चेतन पाठक, डॉ़ मिनल पाटील, डॉ़ निरज जैन, डॉ़ प्रशांत बडे, डॉ़ गणेश सिरसाट, डॉ़ राहुल उंबरे, डॉ़ नितीन इंगळे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते़ दरम्यान, लातूरच्या शासकीय रूग्णालयात शनिवारी संपामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला़ रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या बाह्यरूग्ण विभागात जास्त गैरसोय झाल्याची माहिती आहे़ (प्रतिनिधी) आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी़ ४डॉ़ किरण जाधव यांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य करावे़ तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत घ्यावे़ ४निवासी डॉक्टरांचे कामाचे तास निश्चित करण्यात यावेत़ ४वरिष्ठांकडून होणाऱ्या जाचाबद्दल ठोस उपायोजना करा
मार्डच्या संपामुळे सर्वोपचार रुग्णालयात रूग्णांची हेळसांड
By admin | Updated: August 24, 2014 00:20 IST