शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याअभावी दूध घटले

By admin | Updated: August 7, 2014 01:40 IST

बाळासाहेब जाधव , लातूर गतवर्षीच्या प्रमाणात यावर्षी कमी पाऊस झाला़ कृषी विभागाच्या गतवर्षीच्या पेरणी अहवालानुसार चार महिना पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे़ त्यातच पावसानेही

बाळासाहेब जाधव , लातूरगतवर्षीच्या प्रमाणात यावर्षी कमी पाऊस झाला़ कृषी विभागाच्या गतवर्षीच्या पेरणी अहवालानुसार चार महिना पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे़ त्यातच पावसानेही उघडीप दिल्यामुळे गायी-म्हशींना लागणारा हिरवा चाराही आलेला नाही़ परिणामी, दूध घटले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ७ हजार लिटर्सची घट आहे. लातूर जिल्ह्यात ६ लाख २३ हजार ३३३ पशुधनापैकी ३ लाख ६८ हजार ८३७ गायी व २ लाख ५४ हजार ४९६ म्हशी आदीचा पशुधनाचा समावेश दुग्धव्यवसायात होतो़ या पशुधनासाठी येत्या वर्षभरात १६ लाख मेट्रीक टन चारा उपलब्ध होण्याची शक्यता पशुसंवर्धन विभागाकडून व्यक्त केली जात आहे़ परंतु, २०१४ जुलै अखेरपर्यंत फक्त चार लाख मेट्रीक टन चारा पशुधनासाठी उपलब्ध आहे़ आहे त्या चाऱ्यावर पशुधनाला वर्षभराचा चारा प्रश्न मार्गी लावावा लागणार आहे़ त्यातच पावसाने उघडीप दिल्यामुळे बळीराजाला पशुधनाच्या चारा प्रश्नासाठी अनंत अडचणीला सामोरे जावे लागणार आहे़ पशुधनासाठी १६ लाख मेट्रीक टन चारा उपलब्ध होणार असल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून केला जात असला तरी पुरेशा पावसाअभावी चारा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे दूध देणाऱ्या गायी, म्हशीला हिरवा चारा आॅगस्ट महिन्यापर्यंतही उपलब्ध झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या प्रमाणात ७ हजार लिटर्स दुधाची घट झाल्याचे समोर आले आहे़ पशुसंवर्धन विभाग दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना दुभत्या गायी, म्हशीच्या संगोपनासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना आणल्या जात आहेत़ परंतु, पुरेसा पाऊस व हिरवा चारा आलेला नाही़ त्यामुळे या योजनेअंंतर्गत मिळणाऱ्या पशुधनाचे करायचे तरी काय, असा प्रश्न पशुधन लाभार्थ्यांना पडत आहे़सध्या सप्टेंबर अखेरपर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध आहे. तरी महिन्याकाठी शासकीय दूध डेअरीतून २ हजार ५२८ लिटर्स, खाजगी दूध डेअरीतून १४ हजार ५७४ लिटर्स, तर सहकारी संस्थांकडून ६ हजार ५६३ लिटर्स असे एकूण २३ हजार ६६५ लिटर्स दूध जिल्हाभरातून येते़ परंतु, हिरव्या चाऱ्याअभावी महिन्याकाठी ३ हजार लिटर्स दूधाची घट झाली आहे़