शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मिश्रीत इंधन मिळाल्याने संतप्त वाहनचालकांचा पंपावर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 19:17 IST

वाहनचालकांनी इंधन काढून पाहिले असता पेट्रोलमध्ये पाणी आढळले. यानंतर संतप्त वाहनचालकांनी गुरूवारी दुपारी पंपव्यवस्थापनाला जाब विचारल्याने गोंधळ उडाला.

ठळक मुद्देउस्मानपुरा येथील गोपाल टी जवळ मे युनीक अ‍ॅटो नावाचा पंप आहे. बाटलीत इंधनटाकीतील पेट्रोल काढले असता एक लिटरच्या बाटलीत पाणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

औरंगाबाद: उस्मानपु-यातील युनिक अ‍ॅॅटो पेट्रोलपंपावर इंधन भरणा-या वाहनचालकांना भेसळयुक्त पेट्रोल-डिझेल मिळाल्याने अनेकांच्या गाड्या रस्त्यात बंद पडू लागल्या. शेवटी इंधन काढून पाहिले असता पेट्रोलमध्ये पाणी आढळले. यानंतर संतप्त वाहनचालकांनी गुरूवारी दुपारी पंपव्यवस्थापनाला जाब विचारल्याने गोंधळ उडाला.

याविषयी अधिक माहिती अशी की, उस्मानपुरा येथील गोपाल टी जवळ मे युनीक अ‍ॅटो नावाचा पंप आहे. या पंपावर बन्सीलालनगर येथील रोहित धूत यांनी त्यांच्या दुचाकीमध्ये शंभर रुपयांचे पेट्रोल भरले. यानंतर ते पंपावरून एक ते दोन किलोमिटरपर्यंत गेल्यानंतर गाडी अचानक बंद पडली. गाडी सुरू झाली की सारखी बंद पडायची यामुळे त्यांनी इंधन टाकीत एअर अडकला असेल असे समजून एका पाण्याच्या प्लास्टीक बाटलीत इंधनटाकीतील पेट्रोल काढले असता बाटलीत पाणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

देवगिरी कॉलेजमध्ये शिकत असलेला आकाश पवार(रा.बीड)यानेही सकाळी त्याच्या दुचाकीत इंधन टाकले असता त्याची दुचाकीही सारखी बंद पडू लागल्याने त्यांनेही एका बाटलीत गाडीतील पेट्रोल काढून पाहिले असता त्यात बाटलीच्या तळाशी पाणी साचल्याचे दिसले. अभिजीत अरकीलवार यालाही आल्याचे त्यांनी सांगितले. तर मयुर पाटील यांनी त्यांच्या कारमध्ये याच पंपावरून इंधन टाकले. गाडी सारखी बंद पडू लागल्याने त्यांनी कशीतरी गॅरेजवर नेली. यावेळी गॅरेजवाल्याने त्यांना इंधनमध्ये भेसळ असल्याचे सांगितले. याशिवाय ज्या लोकांनी या पंपावर इंधन भरले त्याबहुतेक सर्वांना पाणीमिश्रीत इंधन मिळाल्याच्या तक्र ारी घेऊन शंभरहून वाहनचालक गुरूवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास  युनीक अ‍ॅटो पंपावर गेले. यावेळी पंपाच्या केबिनमध्ये बसलेल्या व्यवस्थापकांकडे  याविषयी तक्रार केली असता तेथील कर्मचा-यांनी तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तक्रारदार संतप्त झाले, यातून वाहनचालक आणि  कर्मचारी यांच्यात गोंधळ वाढू लागला.