लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडकरांना परतीच्या पावसाकडून मोठ्या अपेक्षा आहेत़ गेल्या पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्रीपासून नांदेड शहरासह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली आहे़ शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत शहरात पावसाची रिपरिप सुरु होती़मृग नक्षत्रानंतर उघडीप दिलेल्या पावसाने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळवले होते़ नंतरची सर्व नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर पूनर्वसू नक्षत्रात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला़ २० आॅगस्टपासून परतलेला पाऊस जिल्ह्यात धो-धो बसरला़ २१ आॅगस्ट रोजी १६ पैकी १२ तालुक्यांत अतिवृष्टी झाली़ त्यामुळे जिल्ह्यात जवळपास सर्वच प्रकल्पांतील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली होती़ विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजेही चार वेळेस उघडण्यात आले होते़ २५ आॅगस्टलाही नांदेडात पावसाने जोरदार हजेरी लावली होती़ त्यानंतर मात्र पावसाने सलग उघडीप दिली़ उन्हाचा पाराही वाढल्याने नांदेडकर घामाघूम झाले होते़ तसेच पिकेही धोक्यात आली होती़ त्यामुळे नांदेडकरांना परतीच्या पावसाकडून मोठ्या अपेक्षा होत्या़ त्यात गुरुवारी रात्रीपासून शहरासह जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली़शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७़१३ मि़मी़पाऊस झाला होता़ शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपासून मात्र शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली़ सुरुवातीला धो-धो बरसणाºया पावसाचा दुपारी बारानंतर मात्र जोर कमी झाली़ त्यानंतर तीन वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती़ त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचल्याचे पहावयास मिळाले़ आतापर्यंत जिल्ह्यात ५३५़०२ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़
शहरात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:45 IST