शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पुरामुळे २६ गावांचा तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:07 AM

शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे कसुरा, इंद्रायणी, लेंडी या नद्यांना पूर आला़ तर पिंगळगड, धामोणी, धरमोडी या ओढ्यांसह अनेक छोट्या ओढ्यांना पूर आल्याने तब्बल २६ गावांचा संपर्क तुटला होता़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे कसुरा, इंद्रायणी, लेंडी या नद्यांना पूर आला़ तर पिंगळगड, धामोणी, धरमोडी या ओढ्यांसह अनेक छोट्या ओढ्यांना पूर आल्याने तब्बल २६ गावांचा संपर्क तुटला होता़ रविवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती़ दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर दाखल झालेल्या पावसामुळे शेतकºयांत समाधानाचे वातावरण आहे.परभणी जिल्ह्यात दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली आहे़ ३८ मंडळांपैकी ४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, रविवारी दिवसभर पाऊस सुरू होता़ या पावसामुळे यावर्षी प्रथमच ओढे, नाले खळाळून वाहिले़ परभणी तालुक्यातील इंद्रायणी नदीला पूर आला तर पिंगळगड नाल्याला आलेल्या पुरामुळे विद्यापीठातून जाणारा रस्ता बंद झाला होता़ परिणामी बलसा, सायाळा, शेंद्रा, रायपूर, लोहगाव या गावांचा संपर्क तुटला होता़ धामोडी ओढ्याला पूर आल्याने या परिसरातील नांदखेडा, करडगाव, सनपुरी, धारणगाव, हिंगला, वाडी दमई, साटला, सुलतानपूर या गावांचा संपर्क तुटला होता़पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी या सहा गावांचा संपर्क तुटला होता़ त्याचप्रमाणे मानवत तालुक्यातील कोल्हा-कोथाळा रस्त्यावरील धरमोडा ओढ्याला पूर आल्याने कोथाळा, सोमठाणा, आटोळा, राजुरा, नरळद, टाकळी नीलवर्ण, शेवडी या सात गावांना जाणाºया रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. सेलू तालुक्यामध्ये कसुरी नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता़ तसेच वालूर गावाकडे जाणाºया रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़