शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड येथील बंद महाविद्यालय सुरू करण्यासाठी आटापिटा; विद्यापीठ प्रशासनावर राजकीय दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 19:07 IST

मोहाडी (ता. कन्नड) येथील महाविद्यालय २००६ मध्ये संस्थेने बंद केले होते.

- राम शिनगारे 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेले मोहाडी (ता. कन्नड) येथील महाविद्यालय २००६ मध्ये संस्थेने बंद केले होते. हे महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून राजकीय हस्तक्षेप आणण्याचा संस्थाचालकाचा आटापिटा सुरू आहे. महाविद्यालयाला २०१७-१८ आणि २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात मान्यता देण्यासाठी पदवीचे प्रवेश होऊन परीक्षा अर्ज भरले असताना समिती पाठविण्याचा घाट घातला आहे.

सातपुडा विकास मंडळाने (ता. रावेर) २००१ मध्ये मोहाडी येथे सुरू केलेले महाविद्यालय २००६-०७ मध्ये बंद केले. यामुळे विद्यापीठाने याठिकाणी महाविद्यालय सुरू करण्यासाठी २००६ ते २०११ आणि २०११ ते २०१६ च्या बृहत आराखड्यात तरतद केली. यानुसार दुसऱ्या एका संस्थेने २०१४ मध्ये येथे महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव विद्यापीठ व राज्य सरकारने मंजूर केला. त्यामुळे बृहत आराखड्यानुसार एक महाविद्यालय सुरू झाले.

मात्र सातपुडा संस्थेने दहा वर्षांपूर्वी बंद केलेले महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी जून २०१६ पासून विद्यापीठातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रयत्न सुरूकेले. दहा वर्षांचे संलग्नीकरण शुल्कही नियमबाह्यपणे भरले. विद्यापीठाने प्रा. डॉ. भगवान गव्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती पाठविली. या प्रकरणाला ‘लोकमत’ने वाचा फोडल्यामुळे संलग्नीकरणाचा हा प्रस्ताव बारगळला. तरीही संस्थाचालकाने प्रयत्न सोडले नाही. अधिष्ठाता, थेट कुलगुरूंनी महाविद्यालयाला भेट दिली. त्यानंतर हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी विद्या परिषद, व्यवस्थापन परिषदेत नियमबाह्यपणे निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाचा प्रस्तावही राज्य सरकारला पाठविला. त्यास अद्यापही मान्यता मिळालेली नसताना विद्यापीठ प्रशासनाने ७ सप्टेंबर रोजी या महाविद्यालयाला दोन शैक्षणिक वर्षांसाठी एकदाच संलग्नता देण्यासाठी समिती पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल आर्दड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. यात चेतना महाविद्यालयाचे  डॉ. दिलीप मिसाळ आणि विद्यापीठातील डॉ. प्रभाकर उंद्रे यांचा समावेश आहे.

बड्या नेत्याच्या नावाने दबावमहाविद्यालयाला बेकायदा मान्यता देण्यासाठी भाजपच्या जालना जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या नावाने त्यांचा पीए विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकत आहेत. त्यास औरंगाबाद महापालिकेतील भाजपचे माजी महापौर आणि उपमहापौर साथ देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राजकीय दबावासह विद्यापीठातील एक उपकुलसचिव, व्यवस्थापन परिषदही आग्रही आहे. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचेही समजते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ