शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

‘तंटामुक्ती’वर निवडणूक आचारसंहितेचे सावट

By admin | Updated: September 12, 2014 00:04 IST

बालासाहेब काळे, हिंगोली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली आहेत.

बालासाहेब काळे, हिंगोलीमहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली आहेत. २०१२-१३ या वर्षामध्ये जिल्हा पोलीस प्रशासनाकडून शासनाकडे १५४ तंटामुक्त गावांची यादी पाठविण्यात आली होती. मात्र अजूनही ही गावे तंटामुक्त घोषित केल्याचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही.२०१२-१३ या वर्षात वसमत तालुक्यातील कुरूंदा पोलीस ठाणे हद्दीतील कुरूंदवाडी, सेलू/ वर्ताळा, वाई गोरखनाथ, सिरळी, चोंढी बहिरोबा, लोहरा खु., काठोडा, धामणगाव, पार्डी बु., पांगरा बु., पुयणी बु., दरेगाव, आसोला, लोहरा बु., लोळेश्वर, हिरडगाव, खांबाळा, सुकळी, वाघी, पांगरा शिंदे, सिंगी, सेंदूरसना ही गावे जिल्हा बाह्य मुल्यमापन समितीने तंटामुक्त घोषीत केली होती. याच प्रमाणे हट्टा ठाणे हद्दीतील तुळजापूर वाडी, जोडपरळी, चोंढी शहापूर, सुकापूर वाडी, नहाद, ढऊळगाव, ब्र्राम्हणगाव खुर्द, ब्राम्हणगाव बु., वडद, टेंभुर्णी, आरळ, आजरसोंडा, कोंडसी, जोडजवळा, पोटा खु., हट्टा, कुडाळा, अंजनवाडी, रेऊळगाव, लिंगी, जवळा बाजार ही गावे निवडण्यात आली. कळमनुरी ठाणे हद्दीतील उमरा (हातमाली-शिवणी बु.), सेलसुरा, सोडेगाव, जांभरून, भुतनर सावंगी, जामगव्हाण, खेड, सालेगाव, पिंपळदरी देववाडी, जलालदाभा, सोनवाडी, काकडदाभा, वसई ही गावे तसचे आखाडा बाळापूर ठाणे हद्दीतील कोंढूर, कुपटी, कसबे धावंडा, बेलथर, साळवा, दांडेगाव, कामठा, येहळेगाव तु., डोंगरगाव पुल, येगाव, देवजना, काळ्याची वाडी, डोंगरकडा, औंढा नागनाथ ठाणे हद्दीतील दुरचूना, लिंगपिंपरी, जामदया, गोंडाळा, गणेशपूर, चिमेगाव, गोळेगाव, गांगलवाडी, बेरुळा, उखळी, केळी, सावळी पार्डी, सिद्धेश्वर, येळी या गावांची निवड करण्यात आली. या शिवाय नर्सी नामदेव ठाणे हद्दीतील ब्रम्हपूरी व नर्सी, बासंबा ठाणे हद्दीतील पेडगाव, जोडतळा, अंभेरी, पिंपरखेड, देवाळा, ढोलउमरी, पिंपळदरी, पातोंडा, बोरी शिकारी, लिंबी, भिरडा, खेर्डा, लोहरा, तिखाडी, खरवड, दुर्गधामणी, मेथा, हिवरा बेल, राजूरा, कनका, कळमकोंडा या गावांची तंटामुक्त ग्राम बक्षिसासाठी निवड झाली होती. हिंगोली जिल्ह्यातील १५४ गावांची यादी पोलीस व जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविली आहे. त्यानुसार शासनाने ग्याझेट प्रसिद्ध करून सदरील गावे तंटामुक्त झाल्याचे घोषीत करणे अपेक्षित होते. मात्र एक वर्षाचा कालावधी उलटला तरी अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यंदा २० गावांची निवड झाली असली तरी लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने ही मोहीत अडचणीत आली असून तंटामुक्त गावांची घोषणा अधांतरी राहिली आहे.