व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीरयंदा उन्हाळयात पावसाळा व पावसाळ्यात उन्हाळा असे ऋतुमान बदलल्याने पावसाचे तंत्र बिघडून तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे़ मृग नक्षत्र कोरडेठाक गेल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे़ वरूण राजाच्या विसंवादी सुरामुळे यंदाचा खरीप हंगाम धोक्यात येतो की काय? या एकाच चिंतेने बळीराजाला ग्रासले आहे़ यंदा उन्हाळयात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्यामुळे ऋतुमान बदलून गेले आहे़ ८ जून रोजी मृग नक्षत्रास सुरुवात झाली़ या नक्षात्रात चांगला पाऊस होऊन खरीपाच्या पेरण्या सुरू होतील, असा हवामान खाते व पंचांगकर्त्यांनी वर्तविलेला अंदाज पूर्णत: खोटा ठरला आहे़ शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी महागडे बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी करून ठेवली आहेत़ २२ जून रोजी आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला असून, या नक्षत्राचे वाहन मोर आहे़ या नक्षत्राच्या पूर्वार्धात पाऊस होईल असा पंचांगकर्त्यांचा अंदाज आहे़ गेल्या आठ दिवसापासून सुुर असलेल्या सुसाट वाऱ्यामुळे आकाशात पावसाचे ढगही थांबत नाहीत़ आकाशात रात्रभर शुभ्र चांदणे पडत आहे़ लातूरनंतर उदगीरची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने शेजारच्या आंध्र व कर्नाटकातील शेतकरी उदगीरच्या बाजारपेठेत बी-बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी येतात़ सीमा भागातील शेतकऱ्यांचा तर उदगीरशीच संबंध असल्याने या बाबीचा गैरफायदा घेऊन व्यापारी सर्रास शेतकऱ्यांची लूट करतात़ पेरण्यांचा मोसम आला की व्यापाऱ्यांची पर्वणीच सुुरू असते़ उन्हळ्यात खते व बियाणांचा साठा करून ठेवतात व पाऊस पडला की, जादा भावाने विक्री करून शेतकऱ्यांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास करतात़ शिवाय शहरातील व्यापाऱ्यांनी अप्रमाणित बियाणांची भरमसाठ खरेदी करून तीच अप्रमाणित बियाणे नामांकित कंपन्यांच्या पिशव्यामधून विकून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे़ बोगस बियाणे कांडात कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार उघडकीस आल्याने शेतकऱ्यांनी अनेक वेळा ग्राहकमंचाकडे न्याय मागितला आहे़ उदगीर बाजारपेठेतील पूर्व इतिहास पाहता व्यापाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी कडक नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़सर्वाधिक पाऊस देवर्जन परिसरात़़़यंदा मृग नक्षत्रात सर्वाधिक १०९ मि़मी़ पाऊस देवर्जन मंडळ विभागात झाला आहे एवढा पाऊस होवूनही या भागात खरिपाच्या पेरण्या सुरु झालेल्या नाहीत़ त्यापाठोपाठ उदगीर ४६, वाढवणा ४०, नळगीर ३८, मोघा १९, नागलगाव १४ मि़मी़ एवढा पाऊस झाला आहे़४यंदा कृषी विभागाने घरगुती बियाणांचा अधिक प्रमाणात वापर करण्याचे आवाहन केले आहे़ या आवाहनास शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे शहरातील कृषी सेवा केंद्र मालकांचे म्हणणे आहे़ मात्र खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी मृग नक्षत्र व रोहिणी नक्षत्रातच केली असल्याचे मुंढे फर्टिलायझर्सचे मालक दिगंबर मुंढे यांनी सांगितले़
पावसाचे तंत्रच बिघडल्याने उदगीर तालुक्यात भयावह परिस्थिती
By admin | Updated: June 25, 2014 01:04 IST