कडा: आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथील एकाच कुटुंबातील दहा जणांना बंद बोअरमधील पाणी पिल्याने गॅस्ट्रोची लागण झाली. रुग्णांवर पाथर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथून जवळच जाधव वस्ती आहे. या वस्तीजवळील शेतातील एक बोअर गेल्या पाच महिन्यापासून बंद होता. हा बंद असलेला बोअर गुरुवारी जाधव कुटुंबियांनी सुरू केला. या बोअरचे पाणी पिण्यात आल्याने महादेव शहादेव जाधव (७०), पार्वती जाधव (६३), आदिनाथ जाधव, पुरुषोत्तम जाधव, नंदा जाधव, पुष्पा जाधव, अमोल जाधव, श्रीराम जाधव, रामकृष्ण जाधव, रामहरी जाधव यांना मळमळ, ओकाऱ्या व जुलाब होण्याचा त्रास शुक्रवारी सुरू झाला. त्यांना अगोदर धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णांना अधिकच त्रास होऊ लागल्याने त्यांना पुन्हा पाथर्डी येते हलविण्यात आले. दरम्यान, या परिसरात दोन दिवसांपूर्वीच एका तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. या परिसरात योग्य आरोग्य सेवा देण्याची मागणी दादा गव्हाणे, सचिन वाघुले, शिवा शेकडे यांनी केली आहे. या संदर्भात सु. देवळा प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. कराड म्हणाले, जाधव वस्तीवरील रुग्णांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. तसेच त्या बोअरचे पाणी पिण्यास मज्जाव करण्यात आला आहे. (वार्ताहर)पाच महिन्यांपासून बोअर बंदजाधव वस्तीजवळील बोअर होता पाच महिन्यापानसून बंद.या बंद बोअरचे पाणी पिण्यात आल्याने उद्भवला त्रास.
दूषित पाण्यामुळे एकाच घरातील दहा जणांना गॅस्ट्रोची लागण
By admin | Updated: June 16, 2014 01:13 IST