शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

केबल जळाल्याने ९ तास वीज पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:20 IST

वाळूज उद्योनगरीतील सीएट फिडरवरील केबल जळाल्याने मंगळवारी पहाटे ३ वाजेपासून अर्ध्या वाळूज महानगरातील वीज गूल झाली होती.

वाळूज महानगर : वाळूज उद्योनगरीतील सीएट फिडरवरील केबल जळाल्याने मंगळवारी पहाटे ३ वाजेपासून अर्ध्या वाळूज महानगरातील वीज गूल झाली होती. महावितरणकडून जागी नवीन केबल टाकण्यात आल्यानंतर दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास वीज पुरवठा पूर्ववत झाला.

वाळूज सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या रांजणगाव, वाळूज, जोगेश्वरी, घाणेगाव, कमळापूर,नारायणपूर आदी गावांत महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास अचानक वीज पुरवठा बंद झाला होता. एक तास उलटुन गेल्यानंतरही वीज पुरवठा सुरु न झाल्याने नागरिकांनी महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. तांत्रिक बिघाड झाला असून, लवकरच वीज पुरवठा पूर्ववत होईल, असे अभियंत्यांनी सांगितले.

दरम्यान, वीज पुरवठा खंडीत झाल्याने प्रचंड उकाड्यामुळे अनेकांनी गच्ची व अंगणात आश्रय घेतला होता. महावितरणच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यालगतच्या सीएट फिडरवरील केबल जळाल्याचे अभियंते व कर्मचाºयांच्या लक्षात आले. त्यानंतर ही केबल बदलण्यासाठी शहरी भागातील वीज पुरवठा बंद ठेवण्याची परवानगी घेण्यात बराच वेळ गेला. बºयाच वेळानंतर जळालेली केबल बदलण्यात आली. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास परिसरातील वीज पुरवठा पुर्ववत झाला.

रोजेदारांची झाली गैरसोयवाळूज, रांजणगाव, जोगेश्वरी, नारायणपूर, कमळापूर आदी गावांतील वीज पुरवठा मंगळवारी पहाटे ३ वाजेपासून खंडीत झाला होता. सध्या रमजान महिना सुरु असून, सहेरीची तयारी सुरु असतानाच वीज पुरवठा खंडीत झाल्याने रोजेदार बांधवांची गैरसोय झाली. अनेकांना बॅटरी व मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने सहेरीची तयारी करावी लागली. किमान रजमान महिन्यात तरी विज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी शेख अल्ताफ, नदीम झुंबरवाला, फैयाज कुरेशी, शेख अरशद, बबलू पठाण आदींनी केली आहे.

टॅग्स :Walujवाळूजmahavitaranमहावितरण