शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कार बाजूला घेण्यास सांगितल्याने पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण; एका संशयिताला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 21:44 IST

रस्त्यात उभी असलेली ओमनी कार बाजूला घेण्यास सांगणाऱ्या वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास पाच ते सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली.

ठळक मुद्देरस्त्यात उभी असलेली ओमनी कार बाजूला घेण्यास सांगणाऱ्या वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास पाच ते सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली.मारहाणीत उपनिरीक्षकाचे तीन दात पडले तसंच फ्रॅक्चरही झालं.

जालना- रस्त्यात उभी असलेली ओमनी कार बाजूला घेण्यास सांगणाऱ्या वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास पाच ते सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. मारहाणीत उपनिरीक्षकाचे तीन दात पडले तसंच फ्रॅक्चरही झालं. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, शहर वाहतूक शाखेत कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप भगवान पाटोळे (५४, रा. रामनगर पोलीस कॉलनी) यांची शुक्रवारी साप्ताहिक सुटी होती. दुपारी दीडच्या सुमारास बाजारातून भाजीपाला घेऊन दुचाकीवर घरी जात असताना पोटोळे यांना जैन शाळेच्या मागील बाजूस रस्त्यावर एक ओमनी कार (क्र.एमएच २०, १९५२) उभी असल्याची दिसली. इतर वाहनांना अडथळा होत असल्याने त्यांनी खाली उतरून चालकास कार बाजूला घेण्यास सांगितले. कारमधील संशयित सतीश ताराचंद यादव व संतोष ताराचंद यावद (रा.रामनगर, बालाजी मंदिर) यांनी  दिलीप पाटोळे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. अन्य पाच ते सहा जणांनी धावत येऊन पाटोळे यांना काठ्यांनी मारहाण केली. ‘तेरा काम तमाम कर  देंगे’ असे म्हणत  खिशातील अठराशे रुपये काडून घेऊन पळून गेले.

मारहाणीत पाटोळे यांचे तीन दात पडले. डोक्याला गंभीर इजा झाली. चेहऱ्याचे हाड फ्रॅक्चर झाले. मारहाण करून संशयित ओमनी कारमधून पळून गेले. या प्रकरणी पाटोळे यांनी शुक्रवारी रात्री सतीश ताराचंद यादव, संतोष ताराचंद यादव यांच्यासह चार महिला व अन्य पाच ते सहा जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात जिवे माहरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सतीश यादव यास पोलिसांनी शनिवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यास १८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक काकडे तपास करत आहेत.