शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:13 IST

बुधवारची रात्र लासूर रेल्वेस्थानकावरील कर्मचा-यांसाठी चांगलीच धावपळीची ठरली. रात्रीची हुडहुडी भरविणा-या अंधारात सतर्कता आणि चपळता दाखवून कर्मचा-यांनी सात जणांना रेल्वे खाली येण्यापासून वाचविले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बुधवारची रात्र लासूर रेल्वेस्थानकावरील कर्मचा-यांसाठी चांगलीच धावपळीची ठरली. रात्रीची हुडहुडी भरविणा-या अंधारात सतर्कता आणि चपळता दाखवून कर्मचा-यांनी सात जणांना रेल्वे खाली येण्यापासून वाचविले.सविस्तर घटना अशी की, मध्य प्रदेशातील खंडवा भागातील २० कामगार बुधवारी (दि.२५) रात्री लासूरला येण्यासाठी मनमाड येथून पुणे-निजामाबाद पॅसेंजर रेल्वेमध्ये बसले. मध्यरात्री १२.१७ वाजता ही पॅसेंजर लासूर स्थानकाच्याप्लॅटफॉर्म दोनवर पोहोचली. तेथे आधीच मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म एकवर उभीहोती.रात्री थंडी असल्यामुळे सर्व खिडक्या बंद केलेल्या होत्या. गाडी थांबल्यानंतर काही मिनिटांनी या कामगारांना कळाले की, लासूर स्टेशन आले आणि खाली उतरण्यासाठी त्यांच्यामध्ये एकच गोंधळ उडाला. घाई गडबडीमध्ये ते प्लॅटफॉर्मवर उतरण्याऐवजी दुस-या बाजूने खाली उड्या मारू लागले. मराठी येत नसल्यामुळे ते त्यांच्या भाषेत जोरात ओरडू लागले.दुस-या बाजूने खडी असल्याने उडी मारल्यानंतर प्रवासी पडले होते. त्यामुळे त्यांचे डोके गाडीच्या चाकाखाली येण्याचा धोका निर्माण झाला असता. त्यांची आरडाओरड ऐकून स्टेशनवर असणारे रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी, दिनेश व्यवहारे, स्टेशन मास्टर कमलकुमार, पॉइंटस्मन सीताराम पोळके यांनी त्वरित तिकडे रेल्वे पटरीकडे धाव घेतली. त्यांनी झटपट सात प्रवाशांना गाडीपासून दूर ओढले. त्यामुळे सामान्य खरचटण्याखेरीज कोणालाच गंभीर इजा झाली नाही. या चार कर्मचाºयांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.