शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

अक्षयतृतीयेवर यंदा दुष्काळाचे सावट

By admin | Updated: April 22, 2015 00:41 IST

बीड : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेवर यंदा दुष्काळाचे सावट स्पष्ट दिसून आले. बाजारात जसा हवा तसा उत्साह दिसला नाही

बीड : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेवर यंदा दुष्काळाचे सावट स्पष्ट दिसून आले. बाजारात जसा हवा तसा उत्साह दिसला नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील बारा मुद्रांक कार्यालयामध्ये केवळ ११६ दस्ताऐवजांची नोंद झाली. तर वाहन बाजारपेठा थंडच होत्या. सोने खरेदीची मात्र धूम असल्याचे दिसले.अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरील खरेदीने धनसंचय वाढतो. त्यामुळे दागिण्यांसह फ्लॅट, विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहनांची खरेदी केली जाते. सोने आणि फ्लॅट हा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून याकडे पाहिले जायचे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत आहे. त्याचा थेट परिणाम बाजारपेठांवर दिसून येत आहे. दरम्यान, शहरी भागातील बाजारपेठा या ग्रामीण भागातील लोकांवरच अवलंबून असतात. लग्नकार्ये व इतर साहित्य खरेदीसाठी ग्रामीण भागातील जवळपास सर्वजणच शहरी भागात येत असतात. यंदा अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे गेल्या वर्षीचा दुष्काळ या वर्षी मुक्कामी थांबला. शेतकऱ्यांची उलाढाल थांबल्यामुळे त्यांच्या हातात पैसा आला नाही. त्यामुळे ते खरेदीला बाहेर पडले नाहीत. याचा परिणाम जून महिन्यापासून बाजारपेठांवर दिसून येत होता. पहिल्या दोन महिन्यात पाऊस झाला नव्हता. तिसऱ्या महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. या पाण्यावरच फळबागा व भाजीपाला जोपासला जात होता. त्यात पुन्हा गारपीट व अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकरी पार कोलमडून पडला. दुष्काळाचे सावट आणखी दोन महिने राहणार आहे. येणाऱ्या पावसाळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)अक्षय तृतीयाच्या मुहर्तावर नवीन वस्तूची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मंगळवारी शहरात दीड कोटी रूपयाचे सोने खरेदी नागरिकांनी केले. यामध्ये ग्रामीण ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद होता. शहरीबाबूंनी मात्र सोने खरेदीला पसंदी दिली. याशिवाय गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीकडे मात्र नागरिकांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र पहावयास मिळाले.साडेतीन मुहर्तापैकी एक मुहर्त म्हणून अक्षयतृतीया दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केल्यामुळे धनाची भरभराटी होते असे मानले जाते. यामध्ये मंगळवारी सोने, चांदी खरेदीला मोठा प्रतिसाद होता. गुंजभर का होईना सोने खरेदी करण्याकडे नागरिकांचा भर होता. सोने खरेदीसाठी ग्रामीण भागातील ग्राहकांनी पाठ फिरविली. गत तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झालेली आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांनी सोने खरेदी केले नाही. दुपार नंतर वाढली गर्दी४बीड शहरात एकूण ९५ सोन्यांची दुकाने आहेत. दुपार नंतर सर्वच दुकानांवर ग्राहकांची गर्दी असल्याचे चित्र पहावयास मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्के सोन्याचे भाव वाढले असल्याचे येथील सुवर्णकार सचिन डहाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.आमरसावर ताव; बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी अक्षयतृतीया जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच बाजारात आंबे खरदेसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आंब्याचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसे वाढलेले नाहीत. यावर्षी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे गावरान आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे बीडच्या भाजीमंडईत गावरान आंबे फारसे पहावयास मिळाले नाहीत. मात्र बाहेर राज्यातून बीड शहरामध्ये लंगडा, हापूस, दशहरी यासह इतर जातीचे आंबे विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. या आंब्याच्या किमती १०० ते २५० रुपयांच्या घरात होत्या. आंब्याची मागणी चांगली होती, अशी प्रतिक्रिया आंबा विक्रेते शेख आमेर यांनी सांगितले. पुढील काळात आंब्याच्या किमती काही प्रमाणात वाढतील. मात्र अक्षयतृतीयेच्या निमित्ताने अनेकांनी पुरणपोळीसह आमरसाचा आनंद लुटला.