शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसच्या अपघातामुळे वाढली भीती

By admin | Updated: December 11, 2014 00:46 IST

सोयगाव : शेंदूर्णी येथे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा अपघात झाल्यामुळे पालकांमध्ये भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे.

सोयगाव : शेंदूर्णी येथे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा अपघात झाल्यामुळे पालकांमध्ये भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे. कालबाह्य वाहनांमधून मुलांना पाठवायचे की नाही, असा प्रश्न पालकांना पडला आहे. गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे किंवा शाळांनीच चांगल्यावाहनांची व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.सोयगाव शहरातील एक हजार मुले-मुली शेंदूर्णी (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करतात. खासगी शाळांमधील दर्जेदार शिक्षणाच्या आशेपायी पालक मुलांना सात कि.मी. लांब शिकण्यासाठी पाठवितात. ३ वेगवेगळ््या संस्थेच्या शाळा, महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेतात. पूर्वी केवळ एस.टी. पास काढून विद्यार्थी जात असत; परंतु विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे खासगी स्कूल बसमध्ये विद्यार्थी ये-जा करू लागले. सर्व शाळा मिळून किमान १५ वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. यासाठी संस्थांनी खासगी वाहनांना विद्यार्थी वाहतुकीची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी कालबाह्य झालेल्या जुन्या गाड्या घेऊन हा व्यवसाय सुरू केलेला आहे. अगोदरच जुन्या असलेल्या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविले जातात. त्यामुळे अपघाताची शक्यता जास्त असते.मागणी झालेल्या वाहनांची अवस्था पाहून टायर जाम झाल्यामुळे अपघात झाल्याचे दिसत आहे. अपघातामध्ये ड्रायव्हर शेजारी बसलेले मुले पूर्णपणे दबलेली होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी करवत, कटर, पहार यासारखे साहित्य वापरावे लागले. शेवटी जेसीबीने ओढून एक मुलगा बाहेर काढावा लागला. स्कूल बसला सोयगावमध्ये पहिल्यांदाच अपघात झाला. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली आहे. मुलांच्या शिक्षणाविषयी पालक चिंता व्यक्त करीत आहेत.