शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
2
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
3
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
4
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
5
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
6
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
7
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
8
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
9
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
10
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...
11
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
12
Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!
13
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
14
भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....
15
दिवसभर केलं शूट, इंटिमेट सीननंतर झाल्या वेदना; 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
16
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
17
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
18
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
19
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
20
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

By admin | Published: May 06, 2017 12:14 AM

उस्मानाबाद : लातूर- मुंबई एक्सप्रेस रेल्वे पूर्ववत लातूर येथील रेल्वे स्थानकावरूनच सोडावी, या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : लातूर- मुंबई एक्सप्रेस रेल्वे पूर्ववत लातूर येथील रेल्वे स्थानकावरूनच सोडावी, या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़ शुक्रवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन देण्यात आले़मुंबई - लातूर ही एक्सप्रेस रेल्वे बिदरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ या निर्णयामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ विविध संघटनांच्या वतीने शुक्रवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती़ शुक्रवारी सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी विधीज्ञ मंडळ, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, रेल्वे लोक आंदोलन समिती, सेव फार्मर्स विजेस् व ड्रगिस्ट असोसिएशन, रोटरी क्लब, जिल्हा मराठी पत्रकार संघ, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते़ त्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून शासन निर्णयाचा निषेध नोंदविला़ या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून ९ मे रोजी उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला़ वाशी येथील व्यापारी संघाने बाजारपेठ बंद ठेवून जिल्हास्तरीय व्यापारी संघाच्या आंदोलनास पाठिंबा दिला. व्यापारी संघाने अचानकपणे बाजारपेठ बंद ठेवल्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. हॉटेलचालकासह इतर छोट्या व्यावसायिंकांनाही याचा फटका सहन करावा लागला़ या बंदमध्ये व्यापारी संघाचे अध्यक्ष मुकुंद शिंगणापुरे, सचिव अ‍ॅड.प्रवीण पवार, सूर्यंकांत मोळवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.