शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट गडद

By admin | Updated: July 16, 2014 00:47 IST

नांदेड : जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अद्यापही जोरदार पावसाची गरज आहे

नांदेड : जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अद्यापही जोरदार पावसाची गरज आहे तर काही ठिकाणी पाऊस पडला, मात्र दखलघेण्याजोगे नाही. शेतकऱ्यांनी काळजावर दगड ठेवून पुन्हा पेरण्यांना प्रारंभ केला आहे. किनवट तालुक्यात ६३ मि़मी़ पाऊसकिनवट : गेल्या अठरा वर्षात पहिल्यांदाच १४ जुलैअखेर ६३ मि़मी़ इतका पाऊस झाल्याची नोंद आहे़ यापूर्वी १९९५ ला ९५ मि़मी़ पाऊस पडला होता़ हे विदारक चित्र पाहता तालुक्यात जनावरांच्या व मानवाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली़ खरीप हंगामाच्या पेरण्यावरच गंडांतर आले आहे़ गतवर्षी ही नोंद ५०८ मि़ मी़ इतकी होती़ गतवर्षीच्या तुलनेत ४४५ मि़ मी़ इतका पाऊस कमी आहे़ १९९७ ते २०१३ या १७ वर्षात तीन अंकी पाऊस झाला़ मात्र १४ जुलै १९९६ ते १४ जुलै २०१४ या दोन वर्षात ९५ मि़ मी़ व ६३ मि़ मी़ इतकीच नोंद झाली आहे़ सतरा वर्षानंतरची पुनरावृत्ती २०१४ च्या जुलै महिन्यात झाली आहे़ १५ जुलै २०१४ उजाडणार असला तरी खरीपाच्या पेरण्याच नसल्याने आता पाऊस होवूनही काय उपयोग़ पाऊस झाला तर खरीपासाठी फायदेशीर नसून भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी फायदेशीर राहील असे काही जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़ गेलया १८ वर्षात १४ जुलैपर्यंत झालेला पाऊस वर्षनिहाय याप्रमाणे- १९९७-२३५ मि़मी़, १९९८-३५९ मि़मी़, १९९९-३९४, २०००-३९१, २००१-४०७, २००२-६६२, २००३-५६८, २००४-१२९, २००५-५५९, २००६-४२९, २००७-३५१, २००८-२८६, २००९-२०९, २०१०-१९३, २०११-२५६, २०१२-२६४, व २०१३-५०८ मि़मी़ इतक्या पावसाची नोंद झाली होती़ (वार्ताहर)हिमायतनगर तालुक्यात तिबार पेरणीचे संकटहिमायतनगर : तालुक्यात १६ जून ते ९ जुलैच्या दरम्यान बहुसंख्य शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या केल्या़ ३३ हजार २०० हे़ पैकी १८ हजार ९५३ हेक्टर जमिनीवर पेरणी झाली़ तालुक्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट ओढावले आहे़ सरासरी ५७ टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अ़दावलबाजे यांनी दिली़पेरणी झालेले पीकनिहाय क्षेत्र कापूस १३ हजार ५२९ हेक्टर, सोयाबीन ३ हजार ६१९ हे़, ज्वारी २६६ हेक्टर, तूर १२६७ हे़, मूग ५३, उडीद ५७ हेक्टर असे १८ हजार ९५३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे असून जनावरांना चारा व पाणी मोठा प्रश्न आहे़ जनावरांचा चारा १२०० रुपये शेकडा झाल्याची माहिती शेतकरी आनंद संगनवाड, बळवंत जाधव, पोशट्टी अनगुलवार, दत्तराव जाधव, साहेबराव माने, प्रकाश शिंदे, संतोष गाजेवार आदींनी सांगिले़ काही शेतकऱ्यांनी जूनमध्ये धुळलागवण केली़ काहींनी भीज पावसावर लागवण केली़ सर्व बियाणे जमिनीत १५ दिवस राहून नष्ट झाले़ ८ जुलैला थोडा पाऊस झाला़ शेतकऱ्यांनी ९ जुलैला पेरणी केली़ ९ ते १४ जुलैपर्यंत पाऊस पुरेसा नसल्याने अद्याप दुबार पेरणीनंतर तिबार पेरणी करावी लागणार आहे़ बाजारात ग्रामीण भागातून खरेदीसाठी येणाऱ्यांची आवक घटली़ शेतमजुरांना काम नाही़ शेतकरी, शेतमजूर परेशान आहेत़ शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ आता पावासची नोेंद तहसीलकडून मिळू शकली नाही़ परंतु मागील वर्षी १४ जुलैला ३६७ मि़मी़ पावासची नोंद आहे़.(वार्ताहर)हदगाव: शेतकरी हवालदिलहदगाव : तालुक्यात आजपर्यंत अल्प पेरण्या झाल्या आहेत़ शेतकऱ्यांनी घेवून ठेवलेली बी-बियाणे, खते, फवारण्यासाठी घेतलेली औषधे आता घरात अडचण करीत आहेत़ शेतकऱ्यांनी बँकामधून पीक कर्ज घेतला आहे़ तर काही शेतकऱ्यांना पीक कर्जाची रक्कम अपुरी पडत असल्याने त्यांनी घरातील सोन्याचे दागदागिने तारण ठेवून त्यावर कर्ज उचलले असून या सर्व पैशाने खत, बी-बियाणे, औषधी खरेदी केली़ या पैशास व्याज सुरू देखील झाले़ पण व्याजाने पैसे काढून देखील याचा काही उपयोग झाला नाही़ तशाच्या तसे सर्व खते, बियाणे, औषधी पडून आहेत़ तरी धाडस करून काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेतातील विहिरी, बोअरच्या भरवशावर पेरणी केली़ पण यास देखील त्यांच्या पदरी निराशाच आली़ आधीच पावसाळ्यात उन्हाळा वाटत आहे़ यामुळे शेतातील पिकास स्प्रिंकलरद्वारेपाणी देण्याकरिता शेतकरी ज्या वेळी विहिरीवरील किंवा बोअरवरील मोटार लावतो त्यावेळी विजेचा दाब बरोबर नसल्याने मोटरही लागत नाही़ २०१३-१४ मध्ये अतिवृष्टीने शेतकरी बेजार झाला़ हातचा पैसा गेला व कर्जाचे डोंगर जसेच्या तसे उभे राहीले आणि यावर्षी देखील तीच परिस्थिती उद्भवते की काय अशी भीती शेतकरी वर्गात वर्तविली जात आहे़ या विषयी हदगाव येथील प्रगतशील शेतकरी अमित तोष्णीवाल म्हणाले, खरीप पेरण्या लांबल्याने याचा रबी पिकाच्या पेरणीवर देखील परिणाम होणार आहे़ आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गव्हाची पेरणी करावी लागते़ तर सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये हरभराची पेरणी करावी लागते़ खरिपाच्या पेरण्या लांबल्याने रबीच्या पेरणी देखील लांबतील व याचा परिणाम पिकाच्या उतारावर होणार असल्याने खरीपासह रबी हंगाम देखील हातचा जातो की काय अशी भीती आहे.(वार्ताहर)उमरी:सरासरी ४७ मि़मी़ पाऊसउमरी :सोमवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत चालूच होता़ मंगळवार ८ जुलै रोजीच्या पावसानंतर झालेल्या या दुसऱ्याने पेरणीला जीवदान मिळाले आहे़ सोमवारी संध्याकाळी तालुक्यात सर्वदूरपर्यंत पाऊस झाल्याचे वृत्त आहे़ उमरी येथे ५५ मि़मी़, सिंधी ५१ मि़मी़, तर गोळेगाव येथे ३५ मि़मी़ एवढ्या पावसाची नोंद झाली़ म्हणजेच तालुक्यात ४७ मि़मी़ एवढा सरासरी पाऊस झाला़ ८ जुलैनंतर या भागात पावसाने दडी मारली व कडक उन्ह सुरू झाले़ त्यामुळे वर आलेले मोड उन्हाने वाळून गेले़ अनेकांची कापूस लावणी व पेरणी वाया गेली़ मात्र तद्नंतर पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला़ मंगळवारी पहाटे काही ठिकाणी बारीक पाऊस होता़ ढगाळ वातावरणामुळे पाऊस येण्याची चिन्हे आहेत़ येत्या काही दिवसात या भागात १०० टक्के पेरणी पूर्ण होईल असे कृषी विभागाने माहिती दिली़ (वार्ताहर)भोकर तालुक्यात पाऊस आला, संकट मात्र कायमभोकर : तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून १४ जुलैच्या रात्री २४़७५ मि़मी़ पाऊस झाला़ पण या पावसाने तलावात पाणी आले नाही आणि शेतकऱ्यांवरचे दुबार पेरणीचे संकटही दूर झाले नाही़मागील दोन दिवसांपासून आकाशात काळे ढगे जमू लागले असल्याने पाऊस येण्याच्या आशा वाढल्या आहेत़ १४ जुलैला रात्री तालुक्यात २४़७५ मि़मी़ पाऊस झाला़ तर आतापर्यंत १०७ मि़मी़ पाऊस झाला आहे़ या पावसात जोर नसल्याने लामकाणी, इळेगाव, आमठाणा, किनी, भुरभूशी व कांडली हे सहाही तलाव तळालाच आहेत़ सदरील पावसाने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकटही दूर झाले नाही़ पण ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी पेरणी केली नाही ते आता पेरणीच्या कामात गुंतले आहेत़ शेतकऱ्यांवर व जनावरांवर असलेले पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासाठी तालुक्यात आता मोठ्या पावसाची गरज आहे़ (वार्ताहर)शेतकऱ्यांना भविष्याची चिंतामारतळा : शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्याने सर्वत्र कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली़ जनावरांसाठी लागणारे वैरणही महाग झाले. १ हजार रुपयाला १०० पेंड्या कडबा विकत घेण्याची वेळ आली. नांदेड तालुक्यातील तुप्पा, काकांडी व मुदखेड तालुक्यातील डोणगाव, वैजापूर पार्डी येथून कडबा खरेदी करीत आहेत. (वार्ताहर)दिवसा वांझोटे आभाळ, रात्री चांदणेशंकरनगर : ८ जुलै रोजी देगलूर भोवती बऱ्यापैकी पाऊस झाला़ पाऊस पडत राहील या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणीला सुुरुवात केली़ पण दिवसा वांझोटे आभाळ, रात्री टिपूर चांदणे, थंडगार वारे असेच दरदरोज घडू लागले़ बियाणे वाया जाईल म्हणून शेतकऱ्यांनी पेरणी बंद केली़ १३ व १४ जुलै दरम्यानच्या रात्री देगलूर तालुक्यात, बिलोली तालुक्याच्या काही गावात चांगला पाऊस झाला तर केरूर शिवार, भोपाळा, कामरसपल्ली, आदमपूर, खतगाव, बिजूर, अंजनी, डोणगाव खु़, डोणगाव बु़, रामतीर्थ, धुप्पट, टाकळी, कुंचेली, किनाळा, हिप्परगामाळ आदी गावात हलका पाऊस झाला़ यापुढे पेरणीसाठी थांबणे शेतकऱ्यांना अवघड झाले़ शेतात पेरलेले बियाणे वाया गेले तर गेले म्हणून १४ जुलैपासून शंकरनगर परिसरातील काही शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे़ (वार्ताहर)फुलवळमध्ये भंडाराफुलवळ : येथे वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी देवाला साकडे घालून भंडाराचे आयोजन केले होते़ वरूण राजाला खूश करण्यासाठी देवाची पूजा, भंडारा करीत आहे़ वरूण राजा काही बरसत नाही, त्यामुळे जनावरांचा चारा, पिण्यासाठी पाणी याचाही प्रश्न गंभीर झाला आहे़ या परिसरातील सर्व बोअर पूर्णपणे कोरडे पडले आहेत़ केवळातांडा व महादेव तांडा येथे आठ दिवसांपासून पाण्याचा थेंबही येथील ग्रामस्थांना मिळत नाही़ येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केली आहे़ जनावरांच्या चाराही उपलब्ध होत नसल्याने आपली जनावरे कवडीमोल भावाने विकत आहेत़ यात व्यापाऱ्यांचे भले होत चित्र आहे़ (वार्ताहर)