शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आज दणाणणार ‘ती’चा ढोल - ताशांचा गजर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:15 IST

आजचा रविवार दुमदुमणार आहे, तो ‘ती’च्या ढोल-ताशांच्या गजरात.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आजवर गणेशोत्सवात केवळ आरतीची तयारी करण्याची जबाबदारी महिलांवर असायची. यंदाच्या गणेशोत्सवात मात्र टाटा टी गोल्ड मिक्स्चर प्रस्तुत ‘लोकमत’ ‘ती’चा गणपती या उपक्रमापासून नियोजन ते प्रतिष्ठापना, अशी सर्वच धुरा ‘ती’च्या हाती देण्यात आली. मग ढोल- ताशांच्या वादनातही ‘ती’ मागे राहणे शक्य नाही. त्यामुळे आजचा रविवार दुमदुमणार आहे, तो ‘ती’च्या ढोल-ताशांच्या गजरात.रविवारी (दि.३)‘ती’चा गणपती उपक्रमांतर्गत प्रोझोन मॉल येथे दुपारी १२ वाजता ढोल- ताशांच्या स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की खास महिलांचे ढोल- ताशा वादनातील कौशल्य यामध्ये पाहायला मिळेल. गणेशोत्सवाला नवे चैतन्य, नवा उत्साह देणाºया या स्पर्धेचे सादरीकरण पाहायला प्रोझोन मॉल येथे अवश्य भेट द्या. प्रोझोन मॉल हे या उपक्रमाचे व्हेन्यू पार्टनर आहेत.या उपक्रमांतर्गत शनिवारी सायंकाळी कुंदा पानसरे, कालिंदी इधाटे, मीना राठोड, रंजना देहाडे या घाटी येथील परिचारिकांच्या हस्ते (नर्स) ‘ती’च्या गणपतीची आरती करण्यात आली.शनिवारी दुपारी बालगणेश स्पर्धा घेण्यात आली. ४ ते १५ वर्षांखालील मुले- मुली आणि त्यांच्या आईसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बालकांनी गणपतीची, तर आईने पर्वतीची वेशभूषा केली होती. प्रीती सोनवणे व मुग्धा धारासूरकर यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. श्रुती टेके आणि संस्कृत टेके यांनी यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर श्रीरंग रहाळकर व बागेश्री रहाळकर ही जोडी दुसºया क्रमांकाच्या बक्षिसाची मानकरी ठरली. सार्थक भोंडवे व अनुपमा भोंडवे यांना तृतीय पारितोषिक मिळाले. धु्रव निंबाळकर व प्रीती निंबाळकर, चिन्मय कुलकर्णी व सीमा कुलकर्णी, अवनिश सूर्यवंशी व समृद्धी सूर्यवंशी या जोड्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.टाटा टी गोल्ड मिक्स्चर प्रस्तुत ‘लोकमत’ ‘ती’चा गणपती उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया, स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करून आपले कर्तृत्व सिद्ध करणाºया महिलांना ‘सर्वगुणसंपन्न सखी’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. पूनम सारडा, अर्चना सोनटक्के, प्रीती सोनवणे, सनवीर छाबडा, मुग्धा धारासूरकर यांना शनिवारी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पूनम सारडा यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा उपक्रमही त्या प्रामुख्याने राबवीत आहेत. सनवीर छाबडा यांनी सिव्हिक रिस्पॉन्स टीमच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे. अर्चना सोनटक्के या सेंट लॉरेन्स शाळेत मुख्याध्यापिका असून, शैक्षणिक क्षेत्रासोबतच कला क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. प्रीती सोनवणे या उद्योजिका असून, फॅशन डिझायनिंग क्षेत्रात त्या लोकप्रिय आहेत. मुग्धा धारासूरकर या प्रसिद्ध ब्युटिशियन असून, महिलांना सौंदर्याशी निगडित सल्ला देण्यासोबतच त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम त्या करतात.