शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
2
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
3
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
4
"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
5
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
6
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
7
Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
8
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
9
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
10
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
11
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
12
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
13
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
14
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
15
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
16
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
17
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
18
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
19
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
20
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात यंदाही दुष्काळच..!

By admin | Updated: September 10, 2016 00:28 IST

विजय सरवदे, औरंगाबाद अजूनही मोठ्या पावसाचे काही नक्षत्र शिल्लक आहेत; परंतु यापुढे मोठे पाऊस झाले तरी केवळ दरवाजांअभावी कोल्हापुरी बंधाऱ्यांतील सर्व पाणी वाहून जाणार आहे.

विजय सरवदे, औरंगाबादयावर्षी जिल्ह्यात सर्वत्र बऱ्यापैकी पाऊस झाला. अजूनही मोठ्या पावसाचे काही नक्षत्र शिल्लक आहेत; परंतु यापुढे मोठे पाऊस झाले तरी केवळ दरवाजांअभावी कोल्हापुरी बंधाऱ्यांतील सर्व पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे यंदाही ग्रामीण नागरिकांच्या नशिबी पुन्हा दुष्काळ आणि पाणीटंचाई कायम राहील, हे मात्र नक्की!मागील काही वर्षांपासून अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे चोरीला गेलेले आहेत, तर काहींचे दरवाजे तुटलेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात पावसाचे पाणी अडवण्यास जिल्हा परिषदेला अपयश येत होते. गेल्या उन्हाळ्यात जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता जि.प.चे अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे बदलण्याचा निर्णय घेतला. ३५०० दरवाजे खरेदी करण्यासाठी उपकरातील तब्बल २.५ कोटी रुपये, तर दरवाजांना रबरी सील बसविण्यासाठी ५० लाखांची तरतूदही करण्यात आली. त्यानुसार जि.प.च्या सिंचन विभागाने दरवाजे खरेदीसाठी अडीच कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता घेण्यासाठी ते जलसंधारण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर केले होते. या प्रक्रियेला जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला; पण अद्यापही तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे दरवाजे खरेदीची प्रक्रिया ठप्प राहिली. आता तांत्रिक मान्यता मिळाली तरी तिचा या वर्षासाठी फारसा उपयोग होणार नाही. नियमानुसार आॅक्टोबर महिन्यामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करावे लागतात. ज्यामुळे त्यात पाणी अडून भोवतालची जमीन सिंचनाखाली येण्यास मदत होते. आता तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेला ई- टेंडरिंग करावी लागेल. त्यानंतर दहा दिवसांनी निविदा उघडल्या जातील. पुढे सर्वसाधारण सभेची दरवाजांच्या दरास मान्यता घ्यावी लागेल. पुढे मग पुरवठादार संस्थेस पुरवठा आदेश द्यावे लागतील. तेथून पुढे ४५ दिवसांच्या आत दरवाजांचा पुरवठा करून ते बसवावे लागतील. तोपर्यंत आॅक्टोबर महिना उलटून जाईल आणि दरवाजे न बसवल्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यांतील सारे पाणी वाहून जाईल. परिणामी, कोल्हापुरी बंधारे नजीकची लाखो एकर शेती पुन्हा सिंचनापासून वंचित राहणार. काही बंधाऱ्यांना दरवाजे आहेत; पण रबरी सील खराब झाल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. किमान रबरी सील खरेदीची प्रक्रिया जिल्हा परिषदेने राबवणे अपेक्षित होते; पण रबरी सील खरेदीची प्रक्रियाही थांबलेली आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्याच्या नशिबी दरवर्षाप्रमाणे यंदाही दुष्काळच राहणार आहे, हे विशेष!