शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

दुष्काळी ढग अन् इच्छुकांचे पीक

By admin | Updated: August 20, 2014 00:24 IST

विजय पाटील, हिंगोली देशात कॉंग्रेसविरोधी लाट असताना हिंगोली लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या ताब्यात गेली. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांसाठी हा आशेचा किरण आहे.

विजय पाटील, हिंगोलीदेशात कॉंग्रेसविरोधी लाट असताना हिंगोली लोकसभेची जागा कॉंग्रेसच्या ताब्यात गेली. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांसाठी हा आशेचा किरण आहे. मात्र त्यावेळी नसलेली लाट आता येईल, असा भाजपा-सेना युतीचा होरा आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ असला तरी राजकीय पक्षांकडे इच्छुकांचे पीक आले आहे. परिणामी, योग्य मशागत न झाल्यास बंडाळीचे तण डोके वर काढणार यात शंका नाही.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागेल, अशी स्थिती आहे. हिंगोलीचे विद्यमान आ.भाऊराव पाटील गोरेगावकर व वसमतचे आ.जयप्रकाश दांडेगावकर यांची उमेदवारी निश्चितच असल्यात जमा आहे. त्यामुळे येथे सत्ताधाऱ्यांत तेवढी चलबिचल नसली तरी विरोधी गटात उमेदवारीसाठी अनेकांचे देव पाण्यात आहेत. कळमनुरीतील राजीव सातव हे आता खासदार झाले आहेत. त्यामुळे येथे कॉंग्रेसमध्ये किमान ९ जणांना उमेदवारी पाहिजे आहे. प्रमुखांपैकी डॉ.संतोष टारफे, संजय बोंढारे, दिलीपराव देसाई, गयबाराव नाईक, जकी कुरेशी ही नावे चर्चेत आहेत. येथे सर्वांनी एकमत करून हा आकडा दोन ते चारपर्यंत खाली आणला तर उमेदवारी न मिळाल्याचा हिरमोड टाळता येणार आहे. शिवाय लोकसभेला जी एकजूट दाखविली तीच पुढे राहिली तरच सगळे सुरळीत होईल. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसही ही जागा आता पुन्हा आम्हाला द्या म्हणून जोर लावत आहे. त्यांचेही इच्छुक कमी नाहीत. अ‍ॅड. शिवाजी माने, डॉ.जयदीप देशमुख आदींचा यात समावेश आहे. भाजपानेही या जागेसाठी मुलाखती घेतल्या. सात जण इच्छुकांच्या रांगेत आहेत. कळमनुरीत शिवसेनेचे माजी आ.गजानन घुगे हे दावेदार असले तरी पक्षातच अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यात डॉ.वसंतराव देशमुख, माजी जि.प.अध्यक्ष गोविंदराव गुट्टे, जिल्हाप्रमुख संतोष बांगर आदी आहेत. त्यातच माजी खा.सुभाष वानखेडे यांचा वेगळा गट सक्रिय आहे, हे लपून राहिले नाही. वसमतमध्ये फारसे वेगळे चित्र नाही. सेनेतील वेगळा गट थेट पडद्यावरच आला आहे. माजी आ.जयप्रकाश मुंदडा यांच्यासमोर अ‍ॅड.शिवाजी जाधव यांच्या रुपाने सवतासुभा उभा केला जात आहे. पूर्वी राष्ट्रवादीकडून जाधव हे लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यांचा हा नवा डाव कोणासाठी डोकेदुखी ठरेल, हे अजूनतरी कळायला मार्ग नाही. अजूनही बरेच जण कोणत्यातरी पक्षाची उमेदवारी मिळवून रिंगणात षड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत.हिंगोलीत कॉंग्रेसचे आ.गोरेगावकर यांच्याशी दोन हात करायला भाजपाकडून कोण उमेदवार राहील, याची संभ्रमावस्था आहे. तानाजी मुटकुळे हे गतवेळचे पराभूत उमेदवार प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र बाबाराव बांगर, अ‍ॅड.प्रभाकर भाकरे, प्रा.पंडितराव शिंदे, मनोज जैन, पुंजाजी गाडे, माणिकराव भिंगीकर, नव्याने कॉंग्रेसमधून प्रवेश केलेले मिलिंद यंबल यांच्यासह १३ जणांनी चुरस निर्माण केली आहे. आतातर माजी आमदार बळीराम पाटील कोटकर हेही भाजपाकडून रिंगणात उतरायचे आहे, असे म्हणू लागले. त्यासाठी त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव येत असल्याचेही ते सांगत आहेत. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांच्या गाठी-भेटी घेतल्या. माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांचीही चाचपणी सुरू आहे. मनसेचे संदेश देशमुख व ओम कोटकरही नशीब आजमावण्यास उत्सूक आहेत. घोडामैदान जवळच आहे. अजूनही अनिश्चिततेचे ढग दूर झाले नसले तरी लवकरच ते दूर होणार आहेत.